Pune Crime | धक्कादायक ! 12 वर्षीय अल्पवयीन मुलीवर 2 महिने केला लैंगिक अत्याचार; 6 जणांविरुद्ध FIR

पुणे / राजगुरुनगर : पोलीसनामा ऑनलाइन –  Pune Crime | एका 12 वर्षीय अल्पवयीन मुलीवर 6 जणांनी धमकावून 2 ते अडीच महिने लैंगिक अत्याचार केल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. ही घटना खेड तालुक्यात घडली आहे. याप्रकरणी पिडित मुलीच्या आईने खेड पोलिस ठाण्यात (Khed Police Station) 6 जणांविरुद्ध तक्रार (Pune Crime) दाखल केली आहे. यावरुन तिघां आरोपींना पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. आणखी तिघे फरार आहेत.

याबाबत अधिक माहिती अशी की, सोन्या घुमटकर, आकाश सुनिल शिंदे, परेश माणिक ढमाले,
अवधुत संतोष कनसे, साईनाथ मुळुक, सुरज सुनिल रोडे सर्व (रा चास, ता. खेड) अशी त्या आरोपींची नावे आहेत.
मुलगी अल्पवयीन असल्याचं माहित असून देखील सोन्या घुमटकर यानं धमकी देऊन जबरदस्तीनं मुलीबरोबर लज्जास्पद कृत्य केले होते.
आणि अन्य 5 जणांनी वेगवेगळ्या दिवशी वेगवेगळ्या ठिकाणी पिडित मुलीला धमकावून जबरदस्ती शारीरिक संबंध (Physical contact) करून लैगिक अत्याचार केला आहे.

दरम्यान. हा घडलेला सर्व प्रकार त्या पिडित मुलीने घरी आईला सांगितला.
त्यांनतर ही घटना उघडकीस आली आहे. याप्रकरणी खेड पोलिसांनी (Khed Police Station)
सोन्या घुमटकर, आकाश शिंदे, सुरज रोडे यांना अटक केली आहे.
तर, परेश ढमाले, अवधुत कणसे, साईनाथ मुळूक हे फरार झाले असून पोलीस त्यांचा शोध घेत आहेत.
या घटनेचा पुढील तपास सहाय्यक महिला पोलीस निरीक्षक वर्षाराणी घाटे (API Varsharani ghate) करित आहे.

 

Web Title : Pune Crime | shocking incident khed taluka twelve year old girl sexually abused two months 6 charged

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

Rajya Sabha By-election | निवडणूक आयोगाची घोषणा ! राज्यसभेच्या 6 रिक्त जागांसाठी पोटनिवडणूक

Thackeray Government | ठाकरे सरकारचा मोठा निर्णय ! मराठवाड्यातील शाळांच्या दुरुस्तीसाठी 200 कोटींची तरतूद

Maharashtra IPS Transfer | राज्यातील 6 आयपीएस अधिकार्‍याची पदोन्नतीने पदस्थापना