Pune Crime | पोलीस असल्याची बतावणी करुन मोटारसायकल नेली चोरुन

पुणे : पोलीसनामा ऑनलाइन – Pune Crime | मित्राची वाट पहात थांबलेल्या तरुणाला मोटारीतून आलेल्या दोघांनी पोलीस असल्याची बतावणी करुन मारहाण (Beating) करुन त्यांच्याकडील मोटारसायकल चोरुन नेली. (Pune Crime)

 

याप्रकरणी संदीप अशोक म्हस्के Sandeep Ashok Mhaske (वय २२, रा. सोमर्डी, पुरंदर Purandar) यांनी भारती विद्यापीठ पोलीस ठाण्यात (Bharti Vidyapith Police Station) फिर्याद (गु. रजि. नं. ५३४/२२) दिली आहे. हा प्रकार कात्रज कोंढवा रोडवरील (Katraj Kondhwa Road) एकता चौकात शनिवारी रात्री आठ वाजता घडला. (Pune Crime)

 

याबाबत पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, संदीप म्हस्के हे त्यांचे मित्र कृष्णा यांची एकता चौकात वाट पहात होते. त्यावेळी एका कारमधून दोघे चोरटे आले. त्यांनी ते पोलीस असल्याची बतावणी करुन त्यांना हाताने मारहाण केली. त्यांच्याकडील मोटारसायकल जबरदस्तीने एकाने चोरुन नेली. दुसरा मोटार घेऊन निघून गेला. पोलीस उपनिरीक्षक ढमे (Sub-Inspector of Police Dhame) तपास करीत आहेत.

 

Web Title :- Pune Crime | Stealing a motorcycle by pretending to be a policeman

 

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

 

हे देखील वाचा