Pune Crime | जेवणामधून गुंगीचे औषध देऊन चोरी; पुणे पोलिसांकडून महिलेला तामिळनाडूतून अटक

पुणे : पोलीसनामा ऑनलाइन –  Pune Crime | घरकाम करणार्‍या महिलेने ज्येष्ठ महिला व तिच्या मुलाला जेवणामधून गुंगीचे औषध देऊन कपाटातील रोख रक्कम चोरुन नेली होती़ या महिलेला वानवडी पोलिसांनी (wanwadi police) तामिळनाडु येथे जाऊन अटक (Pune Crime) केली आहे़

शांती चंद्रन (वय ४३, रा. तिरुवअण्णा मलाई, तामिळनाडु) असे या महिलेचे नाव आहे.
याप्रकरणी एका ६० वर्षाच्या महिलेने वानवडी पोलिसांकडे फिर्याद दिली आहे.
ही घटना ८ ऑगस्ट रोजी रात्री १० ते ९ ऑगस्ट रोजी सकाळी ६ वाजण्यांच्या सुमारास घडली.

याबाबत पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, घोरपडीतील सोपानबाग येथील मिटटाऊन सोसायटीत एक ६० वर्षांची महिला आपल्या मुलासह राहते.
त्यांच्याकडे शांती चंद्रन ही महिला घरकाम करीत होती.
तिने रात्रीच्या जेवणातून फिर्यादी व त्यांच्या मुलाला गुंगीचे औषध दिले होते.
त्यांना गुंगी आल्यावर कपाटात ठेवलेले ९ हजार ५०० रुपये चोरुन नेले होते.
त्यानंतर ती तामिळनाडुला आपल्या गावी पळून गेली होती.

 

Web Title : Pune Crime | Stealing from a meal with narcotics; Pune police arrest woman from Tamil Nadu

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

Crime News | हनीट्रॅपद्वारे दिल्लीतील डॉक्टरला 2 कोटींचा गंडा; यवतमाळमधील एकास अटक

Thackeray government | ठाकरे सरकारचा मोठा निर्णय ! यंदाही गणेशोत्सवासाठी कोकणात जाणार्‍यांना टोल माफ

Pune Crime | भेसळयुक्त ताडी विक्री व लागणारे साहित्य विक्री करणाऱ्यांवर पोलीस आयुक्त अमिताभ गुप्तांची ‘मोक्का’ कारवाई