Pune Crime | बनावट पावती पुस्तके तयार करुन सोसायटीच्या नावाने गोळा केली वर्गणी; तरुणाविरुद्ध वारजे पोलीस ठाण्यात FIR

पुणे : पोलीसनामा ऑनलाइन – Pune Crime | सोसायटीच्या गणेश मंडळाच्या (Society Ganesh Mandal) नावाने बनावट पावती पुस्तक (Bogus Receipt Book) बनवून लोकांकडून गणपतीच्या नावाने वर्गणी गोळा करण्याचा प्रकार समोर आला आहे. सोसायटीची बदनामी केल्याप्रकरणी एका तरुणाविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. (Pune Crime)

 

चेतन अशोक गावडे (Chetan Ashok Gavde) (वय २०, रा. अमृतवेल गृहरचना सोसायटी, वारजे – Warje Malwadi Pune) असे गुन्हा दाखल झालेल्या तरुणाचे नाव आहे. (Pune Crime)

 

याप्रकरणी साई रघुनाथ शिंंदे Sai Raghunath Shinde (वय ३९, रा. अमृतवेल गृहरचना सोसायटी, वारजे)
यांनी वारजे पोलीस ठाण्यात (Warje Malwadi Police Station) फिर्याद (गु. रजि. नं. ३३२/२२) दिली आहे.
हा प्रकार २६ ऑगस्ट रोजी घडला होता.

 

याबाबत पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी व आरोपी हे एकाच सोसायटीमध्ये राहतात.
चेतन गावडे याने तो सोसायटीचा सभासद नसताना त्याला गणेश मंडळासाठी वर्गणी गोळा करण्याचा कुठलाही अधिकार नाही.
असे असताना बनावट पावती पुस्तक बनवून त्याने सोसायटीच्या बाहेरील लोकांकडून गणपतीचे नावाखाली बनावट पावती देऊन ११०० रुपये स्वत: चे फायद्याकरीता घेतले.
सोसायटीची बदनामी करुन सोसायटीच्या लोकांची फसवणूक (Fraud Case) केल्याने गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
वारजे पोलीस (Warje Police) अधिक तपास करीत आहे.

 

 

Web Title : –  Pune Crime | Subscriptions collected in the name of society by creating fake receipt books FIR against youth in Warje police station

 

Join our WhatsApp Group, Telegram, facebook page and Twitter for every update

 

हे देखील वाचा