Pune Crime | चरस तस्करीच्या गुन्ह्यातील आरोपीचे गोव्यातील हॉटेलमधून बेड्यांसह पलायन; पुणे ग्रामीण पोलिसांची शोध मोहीम सुरू

पुणे : पोलीसनामा ऑनलाइन –  Pune Crime | चरस तस्कर प्रकरणी पुणे ग्रामीण पोलिसांच्या (Pune Rural Police) राजगड पोलिसांनी (Rajgad police) एका आरोपीला खेड शिवापूर टोल नाक्यावर (khed-shivapur toll plaza) अटक केली होती. मुस्ताकी रजाक धुनिया Mustaki Razak Dhunia (वय-30 रा. नेपाळ) असे राजगड पोलिसांनी अटक (Pune Crime) केलेल्या आरोपीचे नाव आहे. त्याला तपास कामासाठी गोव्याला (GOA) नेले असताना पोलिसांच्या तावडीतून सोमवारी (दि.11) पळून गेल्याचा प्रकार समोर आला आहे. या प्रकरणाला पोलीस ग्रामीणच्या अधिकाऱ्यांनी दुजोरा दिला असून गोव्यात आरोपीचा शोध सुरु असल्याचे सांगितले.

8 ऑक्टोबर रोजी पुण्यातील (Pune Crime) मुंबई-बंगळूर महामार्गावर (Mumbai-Bangalore highway) राजगड पोलिसांनी मोठी कारवाई करुन तब्बल 6 किलो चरस (charas) जप्त केले होते. आरोपीने हे चरस त्याच्याकडे असलेल्या सॅकमध्ये लपवून ठेवले होते.
आंतरराष्ट्रीय बाजारात या चरसची किंमत 32 लाख रुपये असल्याचे सांगण्यात येत असले तरी अंतराराष्ट्रीय बाजारात त्याचे मुल्यांकन साडेतीन कोटी पेक्षा अधिक आहे. (Pune Crime)

आरोपीला अटक केल्यानंतर त्याला न्यायालयात हजर करण्यात आले होते.
तो नेपाळचा असल्याने त्याची अंमली पदार्थाची तस्करी आंतरराष्ट्रीय पातळीवर सुरु आहे का, याचा तपास करायचा आहे.
त्यामुळे त्याला पोलीस कोठडी देण्याची मागणी सहायक सरकारी वकिलांनी केली होती.
त्यानुसार पुढील तपासणीसाठी त्याला राजगड पोलीस व पुणे गुन्हे शाखेने (Pune Crime Branch) संयुक्तपणे तपासासाठी गोव्याला घेऊन गेले होते.

आरोपीला पुढील तपासासाठी रविवारी सकाळी म्हापसा (गोवा) येथे घेऊन गेले होते. त्याठिकाणी म्हापसा पोलिसांना (Mhapsa police)
पत्र देऊन आरोपीला आपल्या कस्टडीमध्ये ठेवणे गरजेचे होते पण तसे न करता राजगड पोलीस व पुणे गेनेहे शाखेच्या पोलिसांनी आरोपीला
खासगी हॉटेलमध्ये फक्त बेड्या घालून आपल्या ताब्यात ठेवले.
यावेळी राजगड पोलीस ठाण्यातील पोलीस उप निरीक्षक मनोजकुमार नवसरे (PSI Manoj Kumar Navsare), हवालदार महेश खरात, संतोष तोडकर,
शरद धेंडे तर पुणे गुन्हे शाखेचे पोलीस उपनिरीक्षक अमोल गोरे (PSI Amol Gore), मंगेश भगत, अमोल शेडगे, पुनम गुंड यांचा बंदोबस्त होता.

 

राजगड पोलीस आणि पुणे गुन्हे शाखेचे अधिकारी व पोलीस झोपल्याने सोमवारी पहाटे आरोपी मुस्ताकी धुनिया बेड्यांसह फरार झाला.
यामुळे पोलिसांच्या कामगिरीवर संशय व्यक्त केला जात आहे.
गोव्यातील चरस रॅकेट, मुंबई, बिहार पटना व नेपाळ चरस रॅकेट या प्रकरणांचा आता पुढील तपास कसा करणार याबाबत संशय व्यक्त केला जात आहे.
आरोपी फरार झाल्याची तक्रार पोलिसांनी म्हापसा पोलीस ठाण्यात (Mhapsa Police Station) केली आहे.

 

Web Title : Pune Crime | the accused escaped from the clutches of the pune rural police form goa

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

Gold Price Today | पुन्हा कमी झाला सोन्याचा दर, चांदीही झाली ‘स्वस्त’; जाणून घ्या नवीन दर

Stealthing | ‘सेक्स’च्या दरम्यान गुपचुप कंडोम काढण्यावर ‘इथं’ बनवला कडक कायदा ! चर्चा सुरू, लोक म्हणाले – ‘कसे होणार सिद्ध?’

Chitra Wagh | भाजपच्या चित्रा वाघ यांची ‘महाविकास’ सरकारवर घणाघाती टीका, म्हणाल्या – ‘कोरोनाची नाही राज्यात महिला अत्याचाराची लाट’