नवी दिल्ली : वृत्तसंस्था – Gold Price Today | भारतीय सराफा बाजारात आठवड्याच्या पहिल्या व्यवहाराच्या दिवशी म्हणजे 11 ऑक्टोबर 2021 ला सोन्याच्या दरात (Gold Price Today) घसरणीचा कल होता. तर, चांदीच्या दरात (Silver) सुद्धा आज घट नोंदली गेली आहे. मागील व्यवहाराच्या सत्रात दिल्ली सराफा बाजारात सोने 46,097 रुपये प्रति 10 ग्रॅमवर बंद झाले होते. तर चांदी 60,565 रुपये प्रति किग्रॅवर बंद झाली होती. भारतीय सराफा बाजाराप्रमाणे आंतरराष्ट्रीय बाजारात सुद्धा आज सोन्याच्या दरात घसरण झाली, तर चांदीच्या दरात विशेष बदल झाला नाही.
सोन्याचे नवीन दर (Gold Price Today)
दिल्ली सराफा बाजारात सोमवारी सोन्याच्या दरात 59 रुपये प्रति 10 ग्रॅमची किरकोळ घट नोंदली गेली. दिल्ली 99.9 ग्रॅम शुद्धतेच्या सोन्याचा दर आज 46,038 रुपये प्रति 10 ग्रॅमवर बंद झाला. आंतरराष्ट्रीय बाजारात सोन्याच्या किमतीत घसरण नोंदली गेली आणि तो 1,756 डॉलर प्रति औंसवर पोहचला.
चांदीचा नवीन दर (Silver Price Today)
चांदीच्या दरात सुद्धा आज घसरण दिसून आली.
दिल्ली सराफा बाजारात सोमवारी चांदीचा दर 196 रुपयांच्या घसरणीसह 60,369 रुपये प्रति किग्रॅवर बंद झाला.
तर, आंतरराष्ट्रीय बाजारात आज चांदीच्या दरात मोठा बदल झाला नाही आणि तो 22.59 डॉलर प्रति औंसवर पोहचला.
–
सोन्यात का झाली घसरण
एचडीएफसी सिक्युरिटीजचे (HDFC Security) सिनियर अनालिस्ट (कमोडिटीज) तपन पटेल यांनी म्हटले की,
कमोडिटी एक्सचेंजवर सोन्याच्या हाजीर दरात घट झाल्याचा परिणाम सराफा बाजारात सोन्या किमतीवर दिसून आला आहे. (Gold Price Today)
Web Title :- Gold Price Today | gold price today drop down and silver price fell too check new prices of 10 grams gold
Join our WhatsApp Group, Telegram, facebook page and Twitter for every update
LIC Saral Pension योजनेत एकदाच गुंतवा पैसे आणि आयुष्यभर घरबसल्या घ्या पेन्शनचा लाभ; जाणून घ्या
Pune Crime | कोणताही पुरावा नसताना खुनाच्या गुन्हयाचा 48 तासाच पर्दाफाश, सिंहगड रोड पोलिसांची कारवाई