Pune Crime | डिलीव्हरीसाठी दिलेले एलईडी टिव्ही टेम्पोचालकाने परस्पर विकले; कोंढवा पोलिस ठाण्यात गुन्हा

पुणे : पोलीसनामा ऑनलाइन – Pune Crime | ग्राहकांना घरपोच डिलिव्हरी देण्यासाठी टेम्पोवर नेमलेल्या चालकाने ग्राहकांना पोच करण्याऐवजी परस्पर एलईडी टीव्ही (LED Tv) विकल्याचा प्रकार समोर आला आहे. (Pune Crime)

याप्रकरणी विनायक दिंगबर तापकीर (वय २४, रा. तळेगाव ढमढेरे) यांनी कोंढवा पोलीस ठाण्यात (Kondhwa Police Station) फिर्याद (गु. रजि. नं. ५३०/२२) दिली आहे. त्यावरुन पोलिसांनी राम महादेव कोळी Ram Mahadev Koli (वय २५, रा. कोरोळ, ता. उमरगा – Umarga, जि. उस्मानाबाद – Osmanabad) याच्याविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे. (Pune Crime)

याबाबत पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, तापकीर यांचे पिसोळी येथे महावीर इलेक्ट्रॉनिक्स (Mahavir Electronics, Pune) हे दुकान आहे. त्यांच्याकडे चालक म्हणून राम कोळी हा नोकरीला होता. फिर्यादी यांनी १७ मे रोजी त्याला ८ एल ई डी टीव्ही डिलिव्हरी करण्यासाठी दिले. त्यापैकी त्यातील फक्त ४ एल ई डी टीव्ही त्याने डिलिव्हरी केले. इतर ४ टी व्ही त्याने स्वत:च्या फायद्याकरीता विकून फिर्यादी यांची २ लाख ५० हजार ९८५ रुपयांची फसवणूक केली. सहायक पोलीस निरीक्षक मोहिते अधिक तपास करीत आहेत.

Web Title : Pune Crime | The LED TVs provided for delivery were sold by the tempo operator to each other; Crime at Kondhwa police station

Join our WhatsApp Group, Telegram, facebook page and Twitter for every update

 

हे देखील वाचा

 

Gold Silver Price Today | सोन्या-चांदीच्या दरात वाढ की घसरण? जाणून घ्या आजचे ताजे दर

 

Maharashtra Monsoon Updates | मुंबईत 6 जूनला मान्सूनची एन्ट्री?
राज्यात ‘या’ तारखेला वरुणराजाचं आगमन होणार; IMD चा अंदाज

 

Pune Municipal Corporation (PMC) | पावसाळा पूर्व कामांना अद्याप म्हणाविशी गती नाही;
आयुक्तांनी तीनही अतिरिक्त आयुक्तांकडे सोपविली जबाबदारी

 

Pune PMC Water Supply | सूस, म्हाळुंगे आणि बावधन बुद्रूक मधील पाणी पुरवठा प्रकल्पाचा आराखडा
आठवड्याभरात तयार होणार

लवकरच निविदा प्रक्रिया राबवून कामाला सुरूवात केली जाईल –
विक्रम कुमार, महापालिका आयुक्त