Pune Crime | पुण्याच्या कात्रज परिसरातील खुनाच्या गुन्ह्यातील मुख्य आरोपीला 12 तासात अटक

पुणे : पोलीसनामा ऑनलाइन – Pune Crime | पुण्यातील कात्रज परिसरात शुक्रवारी (दि.18) सायंकाळी खुनाची घटना घडली होती. ही घटना कात्रज (Katraj) येथील निंबाळकरवाडी येथे सायंकाळी घडली होती. या गुन्ह्यातील फरार मुख्य आरोपीला गुन्हे शाखेच्या युनिट दोनने (Crime Branch Unit 2) शिताफीने जेजुरी येथील भोसलेवाडी (Bhoslewadi Jejuri) येथून अटक (Arrest) केली. गुन्हा घडल्यानंतर अवघ्या 12 तासात आरोपीला बेड्या (Pune Crime) ठोकल्या आहेत.

 

समीर बापु निंबाळकर Sameer Bapu Nimbalkar (वय-31 रा. महालक्ष्मी मंदिर जवळ निंबाळकरवाडी, कात्रज, पुणे) असे अटक करण्यात आलेल्या आरोपीचे नाव आहे.
तर दशरथ सिंग राजपुत Dashrath Singh Rajput (रा. सणसनगर स्मशानभुमी जवळ निंबाळकरवाडी कात्रज) असे खून झालेल्या व्यक्तीचे नाव आहे.
या प्रकरणी भारती विद्यापीठ पोलीस ठाण्यात (Bharti Vidyapeeth Police Station) गुन्हा (FIR) दाखल करण्यात आला आहे. (Pune Crime)

 

खुनाच्या गुन्ह्यातील आरोपी समीर निंबाळकर हा त्याच्या जेजुरी येथील भोसलेवाडी येथे राहणारा मामा सोमनाथ भोसले (Somnath Bhosale) यांच्याकडे असल्याची माहीती गुन्हे शाखा युनिट दोनच्या पोलिसांना मिळाली.
मिळालेल्या माहितीच्या आधारे पथकाने सोमनाथ भोसले यांच्या घराच्या मागे लपून बसलेल्या आरोपी समीरला ताब्यात घेतले.

 

आरोपीकडे सखोल चौकशी केली असता, मयत दशरथसिंग राजपुत हा दारु पिऊन (Drinking Alcohol) नेहमी वडिलांना शिवीगाळ करत होता.
याच रागातून त्याचा खून केल्याचे आरोपीने कबूल केले.
शुक्रवारी (दि.18) सायंकाळी तो सुमती बालवन शाळेच्या (Sumati Balwan School) मागे थांबलेला दिसला.
त्याला जोरात ढकलून खाली पाडून त्याला लोखंडी वस्तूने डोक्यात मारुन जखमी केल्याचे आरोपीने सांगितले.
आरोपीला पुढील कारवाईसाठी भारती विद्यापीठ पोलिसांच्या ताब्यात देण्यात आले.

ही कारवाई पोलीस आयुक्त अमिताभ गुप्ता (CP Amitabh Gupta), सह पोलीस आयुक्त डॉ. रविंद्र शिसवे (Joint CP Dr Ravindra Shisve), अपर पोलीस आयुक्त गुन्हे रामनाथ पोकळे (Addi CP Ramnath Pokale),
पोलीस उपायुक्त गुन्हे श्रीनिवास घाडगे (DCP Srinivas Ghadge), सहायक पोलीस आयुक्त गुन्हे गजानन टोम्पे (ACP Gajanan Tompe)
यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक क्रांतीकुमार पाटील (Police Inspector Krantikumar Patil), सहायक पोलीस निरीक्षक वैशाली भोसले (API Vaishali Bhosale), पोलीस उपनिरीक्षक यशवंत आंब्रे (PSI Yashwant Ambre), पठाण, पोलीस अंमलदार संजय जाधव (Police Sanjay Jadhav),
मोहसीन शेख, साधना ताम्हाणे, उत्तम तारु, चंद्रकांत महाजन, निखील जाधव, समिर पटेल, मितेश चोरमोले, नवनाथ राख यांच्या पथकाने केली.

 

Web Title :- Pune Crime | The main accused in the murder case in Katraj area of ​​Pune arrested within 12 hours

 

Join our WhatsApp Group, Telegram, facebook page and Twitter for every update

 

हे देखील वाचा