Pune Crime | पुण्यात डीएसके ड्रिमसिटीच्या सुरक्षा रक्षकांवर चोरट्यांचा हल्ला !

पुणे : पोलीसनामा ऑनलाइन –  Pune Crime | अंमलबजावणी संचालनालयाने (ED) कारवाई करुन जप्त केलेल्या फुरसुंगी येथील डी एस के ड्रिमसिटीच्या (DSK Dream City) सुरक्षा रक्षकांवर चोरट्यांनी हल्ला करुन त्यांना जखमी केले. याप्रकरणी हडपसर पोलिसांनी (Hadapsar Police Station) एका सराईत गुन्हेगारासह तिघांवर गुन्हा (Pune Crime) दाखल केला आहे.

 

राज रवि पवार (वय २२), संकेत गायकवाड (वय २२), सुमीत साळवे (वय २३, सर्व रा. गोसावी वस्ती, कवडीपाट, हडपसर) अशी चोरट्यांची नावे आहेत.
सुमीत साळवे हा सराईत गुन्हेगार असून पोलिसांनी त्याला अटक केली आहे.
याप्रकरणी महेश सुभाष सावंत (वय २८, रा. हडपसर) यांनी हडपसर पोलिसांकडे फिर्याद (Pune Crime) दिली आहे.

 

बांधकाम व्यावसायिक डी. एस. कुलकर्णी (DSK Kulkarni) यांचा फुरसुंगी येथे ड्रिमसिटी (Dream City) हा प्रकल्प आहे.
गुंतवणुकदारांची फसवणूक केल्याप्रकरणी त्यांना पोलिसांनी अटक केली असून गेल्या ४ वर्षाहून अधिक काळ ते येरवडा कारागृहात आहेत.
अंमलबजावणी संचालनालयाने डी एस कुलकर्णी यांच्यावर कारवाई करुन त्यांच्या बंगल्यासह अनेक मालमत्ता जप्त केल्या आहेत.
त्याला कोणी वाली नसल्याने तेथे मोठ्या प्रमाणावर चोर्या होऊ लागल्या होत्या. तेव्हा तेथे सुरक्षारक्षकांची नेमणूक करण्यात आली आहे.

महेश सावंत हे तेथे सुरक्षारक्षक म्हणून काम करीत असताना २ नोव्हेबर रोजी रात्री साडेआठ वाजता तिघे जण इमारतीतील स्टील चोरी करण्यासाठी आले.
सुपरवायझर शरद कोंडुसकर यांना राज पवार याने पकडून लोखंडी राॅडचा धाक दाखविला.
संकेत गायकवाड याने सुरक्षा रक्षक निवृत्ती मोरे यांच्या मानेवर कोयता लावला.
सुमीत साळवे याने फिर्यादी यांना कोयत्याने मारुन जखमी केले. संकेत गायकवाड यानेही त्यांच्यावर लोखंडी रॉडने हल्ला (Pune Crime) करुन जखमी केले.
पोलिसांनी सुमीत साळवे याला अटक् केेली असून सहायक पोलीस निरीक्षक थोरात तपास करीत आहेत.

 

Web Title : Pune Crime | Thieves attack DSK Dreamcity security guards in Pune!

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

Radhakrishna Vikhe Patil | ‘राज्य सरकारने भ्रष्टाचाराचे सगळे विक्रम मोडले’ – विखे पाटील

Latur District Bank Election | काँग्रेसला झटका, लातूर जिल्हा बँक निवडणुकीत बाद ठरलेले विरोधाकांचे अर्ज वैध

Bhiwandi Crime | कामाच्या वादातून सहकाऱ्यानेच चिरला 18 वर्षीय तरुणाचा गळा