Pune Crime | समृद्ध जीवनच्या महेश मोतेवार याच्या 5 अलिशान गाड्या CID कडून जप्त

0
444
Pune Crime | vehicles of amruddha Jeevan Fraud Case of Mahesh Motewar's five car seized from maharashtra state criminal investigation department CID
file photo

पुणे : पोलीसनामा ऑनलाइन – Pune Crime | समृद्ध जीवन आर्थिक घोटाळा प्रकरणातील (Samruddha Jeevan Fraud Case) मुख्य आरोपी महेश मोतेवार (Mahesh Motewar) याच्या 5 अलिशान गाड्या जप्त करण्यात आल्या आहेत. ही कारवाई (Pune Crime) राज्य गुन्हे अन्वेषण (CID) विभागाच्या आर्थिक गुन्हे शाखेने केली आहे. जप्त केलेल्या गाड्यांमध्ये मायक्रा, स्विफ्ट डिझायर, मिनी कूपर, पजेरो या वाहनांचा समावेश आहे. समृद्ध जीवन मध्ये देशभरातील अनेक शेतकऱ्यांची आणि गुंतवणुकदारांची फसवणूक (Cheating) झाली आहे.

 

शेतीला पूरक व्यवसाय म्हणून शेळीपालन व अन्य व्यावसायाची जोड देत त्यातुन मोठा आर्थिक फायदा मिळवून देण्याचे आमिष दाखवत महेश मोतेवार व त्याच्या साथिदारांनी महाराष्ट्रासह देशभरातील अनेक शेतकरी व गुंतवणुकदारांची फसवणूक केली होती. याप्रकरणी समृद्ध जीवनच्या महेश मोतेतेवार विरोधात देशातील 22 राज्यात 28 गुन्हे (FIR) दाखल (Pune Crime) आहेत.

 

या घोटाळ्याचा तपास काही वर्षांपूर्वी सीआयडीकडे आला. काही दिवसांपूर्वीच मोतेवारने श्रीमंत दगडुशेठ हलवाई सार्वजनिक गणेशोत्सव मंडळ ट्रस्टच्या मुर्तीला अर्पण केलेले 50 ते 60 लाख रुपये किमतीचे सोन्याचे दागिने जप्त केले होते. या गुन्ह्याचा तपास आर्थिक गुन्हे शेखेचे पोलीस उपअधीक्षक मनीषा धामणे पाटील (Deputy Superintendent of Police Manisha Dhamne Patil) या करीत आहेत.

 

1 जुलै रोजी धामणे यांच्या मार्गदर्शनाखालील पथकाने नऱ्हे येथील समृद्ध जीवन पार्क येथे छापा टाकून
या प्रकरणातील कागदपत्रे दुसरीकडे हलविण्यात येत असताना जप्त केली होती.
पोलिसांना या ठिकाणी एक दुकान व दोन सदनिका भरुन ठेवलेली कागदपत्रे सापडली होती.
त्यानंतर 4 ते 5 दिवसांनी त्यांच्या पथकाने दूसरा छापा टाकला. तेथे सदनिका भरुन कागदपत्रे आढळली होती.

दरम्यान, मागील 15 दिवसात पथकाने मोतेवारच्या अलिशान गाड्या जप्त करण्यावर भर दिला होता.
त्यानुसार मोतेवारच्या पुण्यातील (Pune Crime) धनकवडी येथील बंगल्यातुन 3 गाड्या जप्त केल्या.
त्यानंतर एजंटकडे असणाऱ्या दोन गाड्या जप्त केल्या.
यामध्ये मायक्रा, स्विफ्ट डिझायर, मिनी कूपर, पजेरो या वाहनांचा समावेश आहे.

 

ही कारवाई सीआयडीच्या आर्थिक गुन्हे शाखेचे पोलीस अधीक्षक पंकज देशमुख (SP Pankaj Deshmukh),
पोलीस उपअधीक्षक मनीषा धामणे पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक सीताराम फंड (Police Inspector Sitaram Fund),
विठ्ठल पवार (Vitthal Pawar), सहायक पोलीस निरीक्षक अरुण मोरे (API Arun More), पोलीस हवालदार विकास कोळी, सचिन उबाळे,
महेंद्र तुपे, शांतवन साळवे, आशा जाधव, दिपाश्री साळुंके, ज्योती धनुरकर, दिपाली चव्हाण, मधुरी मोरे, कविता नाईक,
भाग्यश्री मोहिते, आर.डी. साळुंके, हनुमंत कांबळे यांच्या पथकाने केली.

 

Web Title :- Pune Crime | vehicles of amruddha Jeevan Fraud Case of Mahesh Motewar’s five car seized from maharashtra state criminal investigation department CID

 

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

हे देखील वाचा

Ajit Pawar | अजित पवारांनी राज्यात खरेदी-विक्री झालेल्या साखर कारखान्यांची यादीच दाखवली वाचून

Mutual Fund Investment | ‘या’ 5 म्युच्युअल फंडने 1 वर्षात दिला 118% रिटर्न, तुम्ही सुद्धा केली आहे का गुंतवणूक?

Multibagger Stock | ‘या’ शेयरने गुंतवणुकदारांना दिला ‘विक्रमी’ रिटर्न, 1 लाखाचे झाले 12 लाख रुपये, जाणून घ्या पुढे कशी असेल वाटचाल?