Pune Crime | सुप्रसिध्द अमर बिल्डर्सची 5 कोटींची फसवणूक ! अ‍ॅड. पराग देशपांडेविरुद्ध गुन्हा; धर्मादाय आयुक्त कार्यालयाच्या नावाचा केला गैरवापर

पुणे : पोलीसनामा ऑनलाइन – धर्मादाय आयुक्त (Charity Commissioner) कार्यालयाचा अखत्यारीतील एका ट्रस्टची जमीन डेव्हलपमेंटसाठी देण्याच्या बहाण्याने अमर बिल्डर्सची (Amar Builders) तब्बल पाच कोटी 33 लाख 31 हजार 537 रुपयांची फसवणूक करण्यात आल्याचा प्रकार पुण्यात (Pune Crime) उघडकीस आला आहे. धर्मादाय सह आयुक्त कार्यालयाकडून यासंदर्भात फिर्याद दाखल करण्यात आली असून पुण्यातील (Pune Crime) कोरेगाव पार्क पोलिस ठाण्यात (Koregaon Park Police Station) अ‍ॅड. पराग देशपांडेविरुद्ध (Adv. Parag Deshpande) गुन्हा (FIR) दाखल करण्यात आला आहे.

 

अ‍ॅड. पराग देशपांडे Adv. Parag Deshpande (वय 38, रा. गोकुळ नगर, ज्ञानेश्वर पादुका चौक, शिवाजीनगर) असे गुन्हा दाखल झालेल्या चे नाव आहे. या प्रकरणी धर्मादाय सह आयुक्त कार्यालयाच्या अधीक्षिका सुनीता अंकुश तिकोने Sunita Ankush Tikone (वय 56) यांनी फिर्याद दिली आहे. हा प्रकार ऑगस्ट 2021 पर्यंत पुण्यातील (Pune Crime) धर्मदाय सह आयुक्त कार्यालयात घडला.

 

पोलीस उपनिरीक्षक श्रीकांत सावंत (PSI Srikant Sawant) यांनी दिलेल्या माहितीनुसार, पराग देशपांडे यांनी चॅरिटी हेल्पलाइन (Charity helpline) या नावाची फर्म स्थापन केली. ही फर्म धर्मादाय सह आयुक्त कार्यालय यांची अधिकृत फर्म असल्याचे भासविले. अमर बिल्डर्स यांना ट्रस्टची ही जागा डेव्हलपमेंटसाठी (Development) हवी होती. या जागेचे ते विकसन करणार होते. 2011साली धर्मादाय आयुक्त कार्यालयाने या जागेची किंमत तीन कोटी रुपये अशी निश्चित केली होती. त्यावेळी बिल्डर्सकडून ही रक्कम भरण्यात आली नाही. दरम्यान त्यांनी त्याकरिता मुदतवाढ घेतली.

आजमितीस या जागेची किंमत पाच कोटी 33 लाख 31 हजार 537 रुपये असल्याचे देशपांडे यांनी अमर बिल्डर्सला सांगितले.
चॅरिटी हेल्पलाइन या फर्मच्या नावाने बनावट लेटरहेडवर (Fake letterhead) पत्र सादर करून त्यांना वेळोवेळी ही रक्कम भरण्यास भाग पाडले.
वास्तविक चॅरिटी हेल्पलाइन या शासकीय कार्यालयाच्या फलकावरील मजकूर वापरून धर्मादाय विभागाची देखील फसवणूक (Cheating) करण्यात आली (Pune Crime) आहे.

 

पराग देशपांडे हा पेशाने वकील असून तो शिवाजी नगर न्यायालयामध्ये (Shivajinagar Court) प्रॅक्टिस करतो.
अमर बिल्डर्सकडून (Amar Builders) पोलीस आयुक्तालय कार्यालयामध्ये यासंदर्भात तक्रार अर्ज दाखल करण्यात आलेला आहे.

Web Title :- Pune Crime | Well known Amar Builders cheated of Rs 5 crore! Koregaon Park Police of pune police booked Crime against adv. Parag Deshpande; The name of the office of the Charity Commissioner has been misused

 

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

 

हे देखील वाचा

PM Narendra Modi | मानवाधिकाराच्या नावावर काही लोक खराब करतात देशाची प्रतिमा, राहावे लागेल सावध – पीएम नरेंद्र मोदी

Akshay Kumar | अक्षय कुमारचे ‘रक्षा बंधन’ पूर्ण झाले ‘नवरात्री’मध्ये

Pune Crime | हत्या की आत्महत्या ? पुण्याच्या कोंढव्यात सॉफ्टवेअर इंजिनिअरचा राहत्या घरी मृतदेह आढळल्याने प्रचंड खळबळ; पोलिसांचा तपास सुरू