Pune Crime | सोने खरेदीच्या बहाण्याने चोऱ्या करणाऱ्या सराईत महिलेस अटक; दत्तवाडी पोलीसांची कारवाई

पुणे : पोलीसनामा ऑनलाइन – Pune Crime | दत्तवाडी पोलीस ठाणे हद्दीतील नंदादीप ज्वेलर्स (Nandadeep Jewelers) येथे सोनं खरेदीच्या बहाण्याने चोरी करणाऱ्या (Pune Crime) दोघा सराईत महिलेस अटक (Arrested) करण्यात आली आहे. ज्योत्सना सुरज कछवाय (Jyotsna Suraj Kachhvai) (वय 31, रा. अप्पर इंदिरानगर), भाग्यश्री चंद्रकांत जेऊर (Bhagyashree Chandrakant Jeur) (वय 29, रा . भारत नगर, कात्रज) यांच्यावर गुन्हा (FIR) दाखल करुन अटक करण्यात आली आहे. ही कारवाई दत्तवाडी पोलीसांनी (Dattawadi police) केली आहे.

 

याबाबत माहिती अशी की, 2 जून रोजी दुपारच्या सुमारास नंदादीप ज्वेलर्समध्ये काही महिलांनी सोने खरेदीचे बहाण्याने येऊन चोरी केली होती. याबाबत दत्तवाडी पोलिस ठाण्यात (Dattawadi Police Station) तक्रार करण्यात आली होती. यानुसार आज महिला पर्वती दर्शन सातारा रोड येथील पुलाखाली संशयीतरीत्या थांबलेल्या आहेत. अशी माहिती पोलिसांना मिळाली. या माहितीनुसार दत्तवाडी पोलीस ठाणेचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक अभय महाजन (Senior PI Abhay Mahajan) यांचे मार्गदर्शनानुसार तपास पथकांनी सापळा रचून संशयित महिलांना ताब्यात घेतले. (Pune Crime)

पोलिसांनी तपास केला असता त्यांच्याकडून चोरी केलेल्या 50 हजार किंमतीचे सोन्याचे गंठण जप्त करण्यात आले आहे. त्याचबरोबर सदर महिलांकडे अधिक तपास करता यातील ज्योत्सना कछवाय हीने सुमारे एक महिन्यापूर्वी नवी सांगवी याठिकाणी तिचे नणंदेसह प्रगती ज्वेलर्स या ठिकाणाहुन देखील चोरी केल्याचे निष्पन्न झाले त्या महिलेकडून 50 हजार रुपये किंमतीचे सोन्याचे दागिने जप्त करण्यात आले. दरम्यान अजून काही त्यांच्यावर अशा प्रकारचे गुन्हे दाखल आहेत का याबाबत पोलिस तपास करीत आहेत.

 

सदरची कारवाई अपर पोलीस आयुक्त राजेंद्र डाहाळे (Addl CP Rajendra Dahale),
पोलीस उपायुक्त पौर्णिमा गायकवाड (DCP Pournima Gaikwad), सहाय्यक पोलीस आयुक्त सुनिल पवार (ACP Sunil Pawar),
वरीष्ठ पोलीस निरीक्षक अभय महाजन (Senior PI Abhay Mahajan), पोलीस निरिक्षक (गुन्हे) विजय खोमणे (PI Ajay Khomane) यांचे मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक स्वप्नील लोहार (PSI Swapnil Lohar), चंद्रकांत कामठे (Chandrakant Kamathe), पोलिस हवालदार कुंदन शिंदे (Kundan Shinde), राजु जाधव (Raju Jadhav), प्रकाश मरगजे (Prakash Margje), अमित सुर्वे (Amit Surve), प्रमोद भोसले (Pramod Bhosale), दयानंद तेलंगे पाटील (Dayanand Telange Patil), पुरुषोत्तम गुन्ला (Purushottam Gunla), नवनाथ भोसले (Navnath Bhosale), किशोर वळे (Kishor Vale), प्रशांत शिंदे (Prashant Shinde), अमित चिव्हे (Amit Chiwe), शरद राऊत (Sharad Raut), व अमोल दबडे (Amol Dabde) यांनी केली.

 

 

Web Title :- Pune Crime | Woman arrested for stealing gold Dattawadi police action

 

Join our WhatsApp Group, Telegram, facebook page and Twitter for every update

 

हे देखील वाचा