Pune Crime | ‘जाऊ’बाईनं विवाहितेच्या मोबाईलवरुन मेसेज करुन ‘दीरा’च्या मनात निर्माण केला संशय; जाणून घ्या प्रकरण

पुणे : पोलीसनामा ऑनलाइन – Pune Crime | पूर्वी घरात आलेल्या सुनेविषयी नणंद-भावजया, सासू तिच्या पतीचे कान भरायचे. त्यातून सुनेविषयी तिच्या पतीचे तसेच घरातील लोकांची मने कलुषित करण्याचे काम होत होते. आता त्याची जागा मोबाईलने घेतली आहे. एका जावेने विवाहितेच्या पतीच्या मनात संशय निर्माण करण्यासाठी चक्क तिच्या नकळत तिच्या मोबाईलवरुन इतरांना मेसेज केले. त्या मेसेजवरुन पतीच्या मनात संशय निर्माण होऊन तिचा मानसिक व शारीरीक छळ केला गेल्याचा धक्कादायक प्रकार समोर (Pune Crime) आला आहे.

याप्रकरणी कर्वेनगरमध्ये राहणार्‍या एका ३३ वर्षीय महिलेने वारजे पोलिसांकडे (Warje Malwadi Police Station) फिर्याद (गु. र. नं. ३६२/२१) दिली आहे. त्यावरुन पोलिसांनी हिंगण्यात राहणार्‍या पतीसह पाच जणांविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे. हा प्रकार ६ जानेवारी २०१३ पासून ६ जानेवारी २०२१ दरम्यान सुरु होता.

महिलेने दिलेल्या फिर्यादीनुसार, आरोपींनी संगनमत करुन फिर्यादीस घरगुती कारणावरुन वारंवार शिवीगाळ करुन मारहाण केली.
या महिलेला लग्नाच्या वाढदिवशी मासिक पाळी आल्याने पतीने पत्नीला मारहाण करुन तिच्या वडिलांना बोलावून घेऊन शिवीगाळ केली.
तिच्या जाऊने फिर्यादीचा मोबाईल घेऊन इतरांना संशयास्पद मेसेज केले.
जेणे करुन तिच्या पतीला पत्नीच्या चारित्र्याविषयी संशय यावा.
यामुळे घरात तिला मानसिक व शारीरीक छळ (Pune Crime) केला गेला. पोलीस उपनिरीक्षक कथले अधिक तपास करीत आहेत.

 

Web Title :- Pune Crime | woman created suspicion in man mind by texting from the married woman’s mobile; Learn the case

 

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

हे देखील वाचा

Earn Money | जर तुमच्याकडे असेल हे 5 रुपयांचे नाणे तर असे मिळतील 5 लाख रुपये, जाणून घ्या काय करावे लागेल

31 October | 31 ऑक्टोबरपूर्वी उरकून घेतली ‘ही’ 4 महत्वाची कामे तर होईल फायदा, तात्काळ जाणून घ्या डिटेल्स

Pune Crime | सरबतातून गुंगीचे औषध देऊन 16 वर्षाच्या मुलीवर बलात्कार; पुण्याच्या धनकवडी परिसरातील घटना