Pune Crime | पुण्यातील धक्कादायक प्रकार ! 2 जाउबाईंनी एकमेकींच्या पतीवर केला ‘डायरेक्ट’ बलात्काराचा आरोप, पहिली म्हणाली ‘गोठ्यात’ तर दुसरीने लॉजमध्ये ‘काम’ दाखवल्याची दिली तक्रार

पुणे : पोलीसनामा ऑनलाइन – Pune Crime | नात्याने एकमेकींच्या जावा असणाऱ्या दोन महिलांनी एकमेकींच्या पतीविरोधात बलात्काराची तक्रार दिल्याची धक्कादयक घटना पुणे जिल्ह्यात (Pune Crime) उघडकीस आली आहे. या प्रकरणी राजगड पोलीस ठाण्यात (Rajgad Police Station) तक्रार नोंदवण्यात आली आहे. या दोन्ही तक्रारीवरुन पोलिसांनी वेगवेगळ्या गटामधील चार व्यक्तींवर बलात्काराचा (Rape) गुन्हा (FIR) दाखल करुन त्यांना अटक केली आहे.

 

या प्रकरणातील तक्रारदार महिला या नात्याने एकमेकींच्या चुलत जावा आहेत. तसेच त्यांनी एकमेकींच्या पतींविरोधात बलात्काराची तक्रार दिली आहे. यापैकी एकीने शेतातील गोठ्यात बलात्कार (Rape) झाल्याचा आरोप केला आहे. तर दुसरीने लॉजवर (Lodge) नेऊन बलात्कार केल्याचा आरोप केला आहे. भोर तालुक्यामध्ये (Bhor) बलात्काराचे हे परस्परविरोधी गुन्हे (Pune Crime) दाखल झाले आहेत.

 

याप्रकरणी दाखल करण्यात आलेल्या गुन्ह्यात एका महिलेने तिच्यावर 10 ऑक्टोबर ते 5 नोव्हेंबर दरम्यान शेतातील गोठ्यात बलात्कार केल्याचा आरोप तिघा जणांवर केला आहे.
ऊसाला पाणी देण्यासाठी गेले असता चुलत दिराने विनयभंग केला.
त्यानंतर अन्य दोघांसोबत गोठ्यामध्ये येऊन सामूहिक बलात्कार (Gang rape) केला असे या तक्रारीत म्हटले आहे.

 

या प्रकरणातील मुख्य आरोपी (Main accuse) ठरवण्यात आलेल्याच्या पत्नीने पीडित महिलेच्या पतीवर बलात्काराचा आरोप केला आहे.
ऑक्टोबर 2020 ते नोव्हेंबर 2021 या कालावधीत तिच्यावर राहत्या घरी आणि लॉजवर नेऊन बलात्कार केल्याचे तक्रारीत नमूद केले आहे.
यावरुन पोलिसांनी गुन्हा (Pune Crime) दाखल करुन आरोपीला अटक केली आहे.

 

Web Title :- Pune Crime | women accuse each others husbands rape one barn another lodge incident bhor of pune district rajgad police station pune gang case

 

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

 

हे देखील वाचा