Pune Crime | अंगावर गाडी घालतो का असे म्हटल्याने गुंडाने तरुणासह आई, पत्नी, भावाला केली बेदम मारहाण; येरवड्यातील घटना

पुणे : पोलीसनामा ऑनलाइन – Pune Crime | अंगावर गाडी घालतो का असे म्हटल्याने एका तरुणाला गुंडाने कोयत्याने मारहाण करुन त्याच्या घरी जाऊन आई, पत्नी, भावाला बेदम मारहाण करुन जखमी केल्याचा प्रकार येरवड्यातील (Yerwada News) यशवंतनगर येथे घडला. याप्रकरणी येरवडा पोलिसांनी (Yerwada Police Station) सागर संतोष तुजारे Sagar Santosh Tujare (रा. यशवंतनगर, येरवडा) याच्याविरुद्ध गुन्हा दाखल (Pune Crime) केला आहे.

 

याबाबत संतोष मारुती महाडिक (वय ४४, रा. नेताजीनगर, येरवडा) यांनी येरवडा पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. याबाबत पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी हे जात असताना सागर तुजारे याने त्यांच्या अंगावर गाडी घातली. तेव्हा त्यांनी अंगावर गाडी घालतो का असे म्हणाले असता सागर याने फिर्यादी यांना त्यांचे गाडीवर बसवून अण्णाभाऊ साठे सभागृहासमोर आणले. तेथे शिवीगाळ (Pune Crime) करुन कोयत्याने त्यांच्या हातावर वार केले. त्यानंतर फिर्यादीचे घरासमोर जाऊन फिर्यादीचे मोटारसायकलच्या टाकीवर कोयता मारुन तिचे नुकसान केले. फिर्यादीची आई प्रमिला महाडिक, पत्नी रोहिणी महाडिक यांच्या अंगावर धावून गेला. त्यांचा मोठा भाऊ अनिल महाडिक याच्या डोक्यात उलटा कोयता मारुन जखमी केले. पोलीस नाईक माळी तपास करीत आहेत.

 

Web Title :- Pune Crime | Yerwada Police Station Crime News Yashwant Nagar Area

 

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

 

हे देखील वाचा

 

Rupali Chakankar | किरण मानेंना मालिकेतून का काढले? खुलासा करावा; रुपाली चाकणकरांचे निर्मात्यांना पत्र

 

Nana Patole | ‘माझ्या मतदारसंघातील मोदी नावाच्या स्थानिक गुंडाबाबत बोललो; नाना पटोले यांचे स्पष्टीकरण

 

Horoscope (Rashifal) | 18 जानेवारीला सूर्याप्रमाणे चमकणार ‘या’ राशींचे भाग्य, वाचा मेषपासून मीन राशीपर्यंतची स्थिती