तात्पुरत्या कारागृहातून कैद्याचा पळून जाण्याचा प्रयत्न

पुणे : पोलीसनामा ऑनलाइन – तात्पुरत्या कारागृहातून कच्चा कैद्याने पळून जाण्याचा प्रयत्न केल्याची घटना समोर आली आहे. मात्र, कारागृहाच्या सुरक्षारक्षकांनी त्याला ताब्यात घेतले. रविवारी सायंकाळी सहा वाजण्याच्या सुमारास तात्पुरते मागासवर्गीय मुलांचे व मुलींचे शासकीय वसतीगृहात सुरू केलेल्या कारागृहात घडली. कोरोनामुळे कारागृहातील इतर कैद्यांना संसर्ग होऊ नये म्हणून तयार करण्यात आले आहे.

बाळासाहेब गोविंद कांबळे (वय ५०) असे कैद्याचे नाव आहे. याप्रकरणी येरवडा पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, पिंपरी-चिंचवड हद्दीत केलेल्या गुन्ह्यात बाळासाहेब याला अटक करण्यात आली आहे. त्यानुसार काल त्याला येरवडा परिसरात करण्यात आलेल्या तात्पुरत्या कारागृहात दाखल केले होते. त्यावेळी त्याने प्लायवूडचा दरवाजा उघडून खाली उडी मारली. त्यानंतर पळून जाण्याचा प्रयत्न केला. त्यावेळी बंदोबस्तावर असलेल्या कारागृह कर्मचाऱ्यांनी त्याला पळून जाताना पाहिले. तसेच त्याला लागलीच ताब्यात घेतले. अधिक तपास उपनिरीक्षक अमोल वाघमारे करीत आहेत.