Pune Cyber Crime | सायबर तज्ज्ञ पंकज घोडे आणि माजी IPS अधिकारी रवींद्रनाथ पाटील यांच्याकडून 6 कोटीची क्रिप्टोकरन्सी जप्त; जाणून घ्या कोर्टात आज काय झालं PCR की MCR

पुणे : पोलीसनामा ऑनलाइन – Pune Cyber Crime | बिटकॉईन Bitcoin (क्रिप्टोकरन्सी-Cryptocurrency) या अभासी चलन फसवणूक प्रकरणात (Fraud Case) अटक (Arrest) करण्यात आलेल्या सायबर तज्ज्ञांसह (Cyber Expert) माजी आयपीएस अधिकाऱ्याकडून पोलीस कोठडी तपासात पुणे सायबर पोलिसांनी (Pune Cyber Police) सहा कोटी रुपयांचे विविध क्रिप्टोकरन्सी (Pune Cyber Crime) जप्त केली आहे. फसवणूक प्रकरणात अटक करण्यात आलेल्या दोघांना प्रथमवर्ग न्यायदंडाधिकारी श्रद्धा डोलारे (First Class Magistrate Shraddha Dolare) यांनी न्यायालयीन कोठडी (Judicial Custody) मंजूर केली आहे. सायबर तज्ज्ञ पंकज प्रकाश घोडे Pankaj Prakash Ghode (वय-38 रा. ताडीवाला रस्ता) आणि माजी आयपीएस अधिकारी रवींद्रनाथ प्रभाकर पाटील Ex – IPS Officer Ravindranath Prabhakar Patil (वय-45 रा. बिबवेवाडी) यांना बिटकॉईन प्रकरणात पोलिसांना तांत्रिक मदत करण्यासाठी नेमले होते.

 

मात्र या दोघांनी गोपनीयतेचा भंग करुन गैरमार्गाने आरोपींच्या खात्यातील बीटकॉईन त्यांच्या खात्यावर वर्ग केल्याचे उघडकीस आले होते. त्यांना अटक करुन न्यायालयात हजर केले असता त्यांना पोलीस कोठडी सुनावण्यात आली होती. पोलीस कोठडीची मुदत संपल्याने शुक्रवारी (दि.25) न्यायालयात हजर करण्यात आले होते. (Pune Cyber Crime)

 

न्यायालयीन कोठडी मंजूर झाल्यानंतर रवींद्रनाथ पाटील यांनी जामिनासाठी अर्ज दाखल (Bail Application) केला आहे. तर पाटील यांची पत्नी (Wife) कांचन पाटील (Kanchan Patil) आणि भाऊ (Brother) अमरनाथ पाटील (Amarnath Patil) यांनीही सत्र न्यायालयात (Sessions Court) अटकपूर्व जामिनासाठी (Pre-Arrest Bail) अर्ज दाखल केला आहे. त्यावर सोमवारी (दि.28) सुनावणी होणार आहे. पाटील यांनी मोठ्या प्रमाणात क्रिप्टोकरन्सी स्वत: व त्याच्याशी इतर संबंधित व्यक्तीच्या वॉलेटवर घेतल्याचे पोलीस तपासात समोर आले आहे. त्याच्याकडून चालू बाजारभावाप्रमाणे सहा कोटी रुपये किमतीचे विविध क्रिप्टोकरन्सी जप्त (Cryptocurrency Seized) केले आहे.

तसेच आणखी क्रिप्टोकरन्सी जप्त करण्याचे काम सुरु आहे. याशिवाय आरोपींनी अपहार करुन त्यातून कमावलेल्या मालमत्तेचा शोध घेऊन ते जप्त करण्यात येत आहे. या गुन्ह्यामध्ये आरोपींविरुद्ध सक्षम पुरावे गोळा करुन न्यायालयात वेळेत दोषारोपत्र (Charge Sheet) दाखल करायचे असल्याचे पोलिसांनी न्यायालयात सादर केलेल्या रिमांड रिपोर्टमध्ये नमूद केले आहे. पुढील तपास पोलीस निरीक्षक अंकुश चिंतामण (Police Inspector Ankush Chintaman) करत आहेत.

 

काय आहे प्रकरण?
फसवणूक प्रकरणातील आरोपी अमित भारद्वाज (Amit Bhardwaj) व विवेककुमार भारद्वाज (Vivek Kumar Bhardwaj)
या दोघा भावांनी पुण्यासह देशभरातील सुमारे साडेचारशे लोकांची बिटकॉईनमध्ये फसवणूक केली होती.
जगभर गाजलेल्या या प्रकरणात पहिला गुन्हा दत्तवाडी (Dattawadi Police Station) व निगडीमध्ये (Nigdi Police Station) दाखल झाला होता.
पुणे पोलिसांनी (Pune Police) त्यात दोघांना अटक केल्यानंतर देशभरात त्यांच्याविरुद्ध अनेक ठिकाणी गुन्हे दाखल झाले आहेत.
पोलिसांनी या प्रकरणात एकूण 17 जणांना अटक केली होती. बिटकॉईनबाबत (Cryptocurrency) फारशी माहिती
नसल्याने पोलिसांनी सायबर तज्ञ (Cyber Expert) पंकज प्रकाश घोडे व तत्कालीन आयपीएस अधिकारी रविंद्र प्रभाकर पाटील यांची मदत घेतली.
पण, पोलिसांनी विश्वासाने दिलेल्या तांत्रिक माहितीचा दुरोपयोग (Missuse) करुन या मार्गदर्शकांनीच पोलिसांची फसवणूक (Fraud Case) केली.

 

Web Title :- Pune Cyber Crime | 6 crore cryptocurrency seized from cyber expert Pankaj Ghode and former IPS officer Ravindranath Patil; Find out what happened in court today PCR or MCR

 

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

 

हे देखील वाचा

 

Aurangabad Accident | थरारक ! एसटीखाली दुचाकी आल्याने झाला भीषण स्फोट; दुचाकीस्वार गंभीर जखमी

 

Deepika Padukone Oops Moment | भर कार्यक्रमात दीपिकाच्या सोनेरी ड्रेसनं दिला धोका, कॅमेरासमोर झाली Oops Momentची शिकार…

 

MLA Praniti Shinde & Raju Patil On Government House | ‘या’ दोन आमदारांनी सरकारी घरे नाकारली’; सर्वसामान्य जनतेकडून होतंय कौतुक!