Pune Cyber Crime | बजाज फायनान्स कंपनीचे संजीव बजाज यांच्यासह तिघांना ईमेलद्वारे 11.5 कोटी रुपयांच्या खंडणीची मागणी

पुणे : पोलीसनामा ऑनलाइन – अनोळखी व्यक्तींनी कंपनीचा डाटा हॅक (Data Hack) करण्याची धमकी देऊन थेट बजाज फायनान्स कंपनीचे (Bajaj Finance Company) संजीव बजाज (Sanjeev Bajaj) यांच्यासह तिघांना ईमेलद्वारे 11 कोटी 63 लाख रुपयांची खंडणी मागितल्याचा (Demand Ransom) धक्कादायक प्रकार पुण्यात (Pune Cyber Crime) उघडकीस आला आहे. तसेच खंडणी दिली नाहीतर कंपनीचे मोठे नुकसान करु, अशी धमकी (Threat) ईमेलद्वारे (EMail) देण्यात आली आहे. याप्रकरणी पुण्यातील (Pune Cyber Crime) विमानतळ पोलीस ठाण्यात (Viman Nagar Police Station) गुन्हा (FIR) दाखल करण्यात आला आहे.

 

याप्रकरणी बजाज फायनान्सचे अधिकारी युवराज मोरे Yuvraj More (वय-32 रा. हडपसर) यांनी फिर्याद दिली आहे.
त्यावरुन ईमेल पाठविणाऱ्या अनोळखी व्यक्तीविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
संजीव बजाज, वरिष्ठ अधिकारी दीपक रेड्डी (Deepak Reddy), दीपक बगाडी (Deepak Bagadi) यांना 28 नोव्हेंबर रोजी [email protected] या ईमेल वरुन एक संदेश पाठविण्यात आला होता.

 

पाठवण्यात आलेल्या मेलमध्ये आम्हाला 11 कोटी 63 लाख रुपयांची खंडणी द्यावी, अन्यथा कंपनीचा डाटा हॅक करुन कंपनीचे मोठे नुकसान करु, खंडणीची रक्कम डोजे कॉइन (Doze Coin) या चलनाद्वारे पाठवावी, असा मजकूर देण्यात आला होता.
भारतीय चलनात अभासी चलनाचे मूल्य 11 कोटी 63 लाख इतके होते, अशी माहिती पोलिसांनी दिली. (Pune Cyber Crime)

 

याप्रकरणी सुरुवातीला सायबर पोलीस ठाण्यात (Cyber Police Station) तक्रार देण्यात आली.
त्यानंतर सायबर पोलिसांनी या प्रकरणाचा अर्ज विमानतळ पोलिसांकडे पाठवला.
त्यावरुन अनोळखी व्यक्ती विरोधात खंडणीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
पुढील तपास पोलीस निरीक्षक गुन्हे मंगेश जगताप (Police Inspector Mangesh Jagtap) करीत आहेत.

बजाज फायनान्स कंपनीच्या प्रवक्त्यांनी दिलेला माहिती:

कंपनीचा डाटा हॅक करण्याची धमकी देणारे ईमेल काही वरिष्ठ अधिकाऱ्यांना आले आहेत. या प्रकरणी, खबरदारीची उपाय योजना म्हणून कंपनी ने पोलिसात फिर्याद दाखल केली आहे. सावधगिरीचा उपाय म्हणून आणि कायद्याचे पालन करणारी जबाबदार कॉर्पोरेट कंपनी या नात्याने संबंधित कायद्याचे रक्षण करणाऱ्या संस्थेकडे याची फिर्याद दाखल केली आहे. पुढील कारवाईसाठी संबंधित अधिकाऱ्यांसोबत आम्ही काम करत आहोत. यासह आम्ही खात्रीपूर्वक सांगू इच्छितो की, या घटनेमुळे कंपनीच्या प्रणालीवर किंवा कामकाजावर किंवा सुरक्षेवर कोणताही विपरीत परिणाम होणार नाही. आपल्या सर्व प्रणाली सुरक्षित आहेत

 

Web Title :-  Pune Cyber Crime | demand of eleven cr and fifty lakh ransom from sanjeev bajaj and three others via email data hack

 

Join our WhatsApp Group, Telegram, facebook page and Twitter for every update

 

हे देखील वाचा

 

Railway Police | CSMT, कुर्ला रेल्वे स्थानकासह चार ठिकाणी आत्मघाती हल्ला करण्याचा फोन; जबलपूरच्या तरुणाला केली अटक

 

Modi Government | मोदी सरकारकडून ऊस उत्पादकांना मोठा दिलासा ! साखर कारखान्यांचा 8 हजार 400 कोटींचा प्राप्तिकर माफ

 

Pune Corona Updates | अत्यंत चिंताजनक ! पुण्यात गेल्या 24 तासात 4000 पेक्षा जास्त नवे कोरोना रूग्ण, जाणून घ्या इतर आकडेवारी