Pune Cyber Crime | सायबर चोरट्यांचा नवा फंडा; स्क्रीन शॉट पाठवून महिलेची केली 8 लाखांची फसवणूक

पुणे : पोलीसनामा ऑनलाइन – Pune Cyber Crime | ओएलएक्सवर (OLX) कपाट विक्रीच्या पोस्टला प्रतिसाद देऊन चुकून ८ लाख रुपये पाठविल्याचा स्क्रीन शॉट पाठवून सायबर चोरट्याने एका महिलेची तब्बल ७ लाख ६५ हजार रुपयांची फसवणूक (Fraud Case) केल्याचा प्रकार समोर आला आहे. (Pune Cyber Crime)

 

याबाबत हडपसर येथील अ‍ॅमनोरा पार्क टाऊनमधील (Amanora Park Town, Hadapsar) एका ३७ वर्षाच्या महिलेने हडपसर पोलीस ठाण्यात (Hadapsar Police Station) फिर्याद दिली आहे. त्यावरुन आदील फारुखभाई शेख (Adil Farukhbhai Sheikh) याच्याविरुद्ध गुन्हा (FIR) दाखल करण्यात आला आहे. (Pune Cyber Crime)

याबाबत पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी महिलेने घरातील कपाट विक्रीबाबत ओएलएक्स या साईटवर पोस्ट टाकली होती. त्या पोस्टला आरोपीने प्रतिसाद देऊन ते कपाट खरेदी करण्याची तयारी दर्शविली. फिर्यादी यांच्याकडून बँक खात्याची माहिती घेतली. काही वेळाने फिर्यादी यांना फोन करुन माझ्याकडून तुमच्या खात्यावर चुकून ८ लाख रुपये ट्रान्सफर झाले आहेत, ते परत पाठवा, असे सांगून त्याबाबत ८ लाख रुपयांचे स्क्रीन शॉट फिर्यादी यांना पाठविले. कपाटाच्या विक्रीविषयी बोलणे झाले असल्याने त्याचे पैसे पाठविणार असल्याने या महिलेने त्या स्क्रीन शॉटवर विश्वास ठेवला. कपाटाची रक्कम वजा करुन आरोपीच्या बँक खात्यावर ७ लाख ६५ हजार रुपये परत पाठविले.
त्यानंतर फिर्यादी यांनी बँकेत आरोपीने पाठविलेल्या पैशांची चौकशी केली असता
अशा प्रकारे कोणतीही रक्कम फिर्यादी यांच्या खात्यावर पाठविली नसल्याचे निदर्शनास आले.
त्यानंतर फिर्यादी यांनी आरोपीला फोन केला असता त्याने कोणताही प्रतिसाद दिला नाही.
त्यामुळे आपली फसवणूक (Cheating Case) झाल्याचे लक्षात आल्यावर त्यांनी
पोलिसांकडे धाव घेऊन फिर्याद दिली आहे. सहायक पोलीस निरीक्षक थोरबोले तपास करीत आहेत.

 

Web Title :- Pune Cyber Crime | New Fund of Cyber Thieves; 8 lakhs cheated a woman by sending a screen shot

 

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

 

हे देखील वाचा