Pune Cyber Crime News | पुण्याच्या येरवड्यातील इझी पे प्रा.लि. कंपनीची 3.5 कोटींची फसवणूक करणार्‍या नोंदणीकृत एजंटास सायबर पोलिसांकडून अटक

पुणे : पोलीसनामा ऑनलाइन – Pune Cyber Crime News | पुण्यातील येरवडा (Yerwada) परिसरातील इझी पे प्रा.लि. कंपनीची (Easy Pay Private Limited) तब्बल साडे तीन कोटी रूपयांची फसवणूक (Cheating Case) करणार्‍या कंपनीच्याच नोंदणीकृत एजंटला (Registered Agent) सायबर पोलिसांनी (Pune Cyber Police) पश्चिम बंगाल येथून अटक केले आहे. त्याच्याकडून मोबाईल आणि 2 लॅपटॉप जप्त करण्यात आले आहेत. (Pune Cyber Crime News)

 

अंकितकुमार अशोक पांडे Ankit Kumar Ashok Pandey (20, सध्या रा. सी/18, निबे दितो पार्क, ममरा, दुर्गापुर, बर्धमान, पश्चिम बंगाल. मुळ रा. महेश दिन गाव, काजीया, गोडापूर, नवादा, बिहार) असे अटक केलेल्याचे नाव आहे. याबाबत अधिक माहिती अशी की, इझी पे प्रा.लि. येरवडा ही कंपनी भारतभर ऑनलाइन पेमेंटची सुविधान नागरिकांना पुरविण्याचे काम करते. त्यासाठी कंपनीने भारतभर नोंदणीकृत एजंटची नेमणूक केलेली आहे. त्यांच्या माध्यमातून कंपनीचे कामकाज चालते. दि. 11 ऑगस्ट 2022 पासून कंपनीतील नोंदणीकृत असलेल्या एकुण एजंटांपैकी तब्बल 65 एजंटांनी आपआपसात संगणमत करून कंपनीच्या वेबपोर्टल अ‍ॅप व्दारे कंपनीच्या अधिकृत यंत्रणेत कंपनीची फसवणूक (Fraud Case) करण्याच्या उद्देशाने अधिकृत केलेल्या मोबाईल व्यतिरिक्त 2 ते 4 व त्यापेक्षत्त जास्त वेगवेगळ्या मोबाईल हॅन्डसेटचा (Mobile Handset) वापर करून अनधिकृतपणे सदर मोबाईलव्दारे लॉग ईन आयडीने लॉग ईन करून कंपनीच्या तांत्रिक सुविधांचा गैरवापर केला.

कंपनीचे व्हीपीए खात्यामधून त्यांनी इतर 44 बँक अकाऊंटवर एजंटचे कमिशन व्यतिरिक्त तब्बल 3 कोटी 52 लाख 70 हजार 210 रूपये आणि 82 पैसे रूपये वर्ग करून कंपनीची फसवणूक केली. त्यामुळे कंपनीने त्यांच्याविरूध्द पुण्यातील सायबर पोलिस स्टेशनमध्ये (Pune Cyber Police Station) फसवणूक आणि इतर कलमांन्वये गुन्हा दाखल केला होता. (Pune Cyber Crime News)

 

गुन्हा दाखल झाल्यानंतर सायबर पोलिसांनी तपासाला सुरूवात केली. त्यांनी गुन्ह्यातील संशयित आरोपी अंकितकुमार अशोक पांडे याच्या मोबाईलचे तांत्रिक विश्लेषणावरून त्याची माहिती काढली. तो दिल्लीत असल्याचे समजल्यानंतर सायबर पोलिसांचे पथक दिल्लीला रवाना झाले. तेथे गेल्यानंतर तो पश्चिम बंगालमध्ये असल्याची माहिती समोर आली. सायबर पोलिसांचे पथक त्याच्या मागावर गेले. तो एके ठिकाणी जास्त काळ वास्तव्यास नसल्याचे स्पष्ट झाले. पोलिसांनी त्याची सखोल माहिती काढल्यानंतर तो पश्चिम बंगालमध्ये ज्या ठिकाणी आहे तेथे त्याला घेरले आणि त्याला अटक केली. पुण्यात आणल्यानंतर त्याला न्यायासमोर हजर केले असता त्यास दि. 19 जुलै 2023 पर्यंत पोलिस कोठडी सुनावण्यात आली आहे.

सदरची कामगिरी पोलिस आयुक्त रितेश कुमार (IPS Ritesh Kumar),
सह पोलिस आयुक्त संदीप कर्णिक (IPS Sandeep Karnik), अप्पर पोलिस आयुक्त रामनाथ पोकळे (IPS Ramnath Pokale),
आर्थिक व सायबर गुन्हे शाखेचे पोलिस उपायुक्त श्रीनिवास घाडगे (DCP Shriniwas Ghadge),
सहाय्यक पोलिस आयुक्त आप्पासाहेब शेवाळे (ACP Appasaheb Shewale)
यांच्या मार्गदर्शनाखाली वरिष्ठ पोलिस निरीक्षक मिनल सुपे-पाटील (Sr Minal Supe Patil), पोलिस उपनिरीक्षक तुषार भोसले (PSI Tushar Patil),
पोलिस अंमलदार राजकुमार जाबा, बाळासाहेब कराळे, नवनाथ जाधव, निलेश लांडगे,
बापू लोणकर, शाहरूख शेख, संदेश कर्णे, नितीन चांदणे आणि संतोष जाधव यांच्या पथकाने केली आहे.

 

Web Title :  Pune Cyber ​​Crime News | Easy Pay Pvt Ltd in Yerwada, Pune. Cyber ​​police arrests
registered agent who defrauded company of Rs 3.5 crores

 

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

 

हे देखील वाचा