ACB Trap News | वृद्ध शेतकऱ्याकडून 2 लाखाची लाच घेताना दैनिकाच्या संपादकासह दोघे अ‍ॅन्टी करप्शनच्या जाळ्यात

धाराशिव : पोलीसनामा ऑनलाइन – शासनाने पाझर तलाव व साठवण तलावासाठी संपादीत केलेल्या जमीनाचा (Land Acquisition) मोबदल्याचे चेक काढून देण्यासाठी एका वृद्ध शेतकऱ्याकडून 2 लाखाची लाच घेताना (Osmanabad Bribe Case) धाराशिव (उस्मानाबाद) जिल्ह्यातील एका दैनिकाच्या संपादकासह (Editor Of Daily News Paper) एका खासगी व्यक्तीला लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने (ACB Trap News) सापळा रचून रंगेहाथ पकडले. एसीबीच्या पथकाने (ACB Trap News) केलेल्या या कारवाईमुळे जिल्ह्यात खळबळ उडाली आहे. ही कारवाई शनिवारी (दि.15) उस्मानाबाद येथे केली आहे.

 

दैनिक मराठवाडा योध्दा (Daily Marathwada Yoddha) संपादक बाबासाहेब हरीशचंद्र अंधारे Babasaheb Harishchandra Andhare (वय 42 रा. गणपती मंदिर जवळ, आनंदनगर, उस्मानाबाद), खासगी इसम अनिरुद्ध अंबऋषि कावळे Aniruddha Ambrishi Kavale (वय 52 रा. केकस्थळवाडी, उस्मानाबाद) असे लाच घेताना पकडण्यात आलेल्या दोघांची नावे आहेत. याबाबत उस्मानाबाद जिल्ह्यातील 77 वर्षाच्या शेतकऱ्याने उस्मानाबाद एसीबीकडे (ACB Trap News) तक्रार केली आहे. (Osmanabad Bribe Case)

 

तक्रारदार यांचे पत्नीच्या नावे असलेली शेत जमीन शासनाने पाझरतलाव व साठवण तलावा करिता संपादीत केलेली आहे. या जमिनीचा न्यायालयाने दिलेल्या आदेशाप्रमाणे अधिकचा मोबदला प्रांत कार्यालय, उस्मानाबाद येथील अधिकारी व कर्मचारी यांना सांगुन, तुमचे संपादित जमीनीचा मोबदला 26 लाख 56 हजार 017 रुपये व 4 लाख 31 हजार 798 रुपयांचे दोन चेक काढुन देण्याकरिता 2 लाख रुपये लाच रकमेची मागणी केली.

याबाबत वृद्ध शेतकऱ्याने उस्मानाबाद एसीबीकडे (Osmanabad ACB Trap Case) तक्रार केली. एसीबीच्या पथकाने शनिवारी पडताळणी केली असता अनिरुद्ध कावळे आणि बाबासाहेब अंधारे यांनी दोन लाख रुपये लाच मागितल्याचे निष्पन्न झाले. पथकाने सापळा रचून तक्रारदार यांच्याकडून लाचेची रक्कम स्वीकारताना दोघांना रंगेहाथ पकडले. त्यांच्यावर आनंदनगर पोलीस ठाण्यात (Anandnagar Police Station) गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

 

ही कारवाई पोलीस अधीक्षक संदीप आटोळे (SP Sandeep Atole), अपर पोलीस अधीक्षक विशाल खांबे (Addl SP Vishal Khambe),
पोलीस उपअधीक्षक सिध्दाराम म्हेत्रे (DySP Siddharam Mhetre)
यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक विकास राठोड (PI Vikas Rathod)
पोलीस अंमलदार इफतीकार शेख, दिनकर उगलमुगले, मधुकर जाधव, सचिन शेवाळे, आशिष पाटील, विष्णू बेळे,
विशाल डोके,सिद्धेशर तावस्कर, अविनाश आचार्य, नागेश शेरकर, जाकेर काझी, चालक करडे यांच्या पथकाने केली.

 

Web Title :  ACB Trap News | While accepting a bribe of 2 lakhs from an old farmer,
two people along with the editor of the newspaper were caught in the anti corruption net

 

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

 

हे देखील वाचा