Pune Police Crime Branch News | गुन्हे शाखेकडून मोबाईल जबरदस्तीने चोरणार्‍यांना अटक, 9 गुन्ह्यांची उकल

पुणे : पोलीसनामा ऑनलाइन – Pune Police Crime Branch News | पुणे शहर पोलिसांच्या गुन्हे शाखेतील युनिट-5 ने हडपसर, सहकारनगर, कात्रज, मुंढवा आणि वानवडी परिसरातुन महिलांच्या बॅगेमधून जबरदस्तीने मोबाईल चोरणार्‍यांना अटक करण्यात आली आहे. त्यांच्याकडून तब्बल 9 गुन्हे उघडकीस आले आहेत. (Pune Police Crime Branch News)

 

हादीहसन सर्फराज इराणी Hadihsan Sarfraz Irani (23, रा. पाटील इस्टेट, गांधी वस्ती, शिवाजीनगर, पुणे) याला आणि त्याच्या अल्पवयीन साथीदारास मगरपट्टा चौक येथून अटक करण्यात आली आहे. त्याच्याकडून 90 हजार रूपये किंमतीचे 5 मोबाईल हॅन्डसेट जप्त करण्यात आले आहेत. त्याने हडपसर, सहकारनगर आणि कात्रज परिसरातील महिलांच्या हातातील मोबाईल जबरदस्तीने हिसकावून चोरी केल्याचे कबुल केले आहे.

 

जावेद युसूफअली इराणी Javed Yusuf Ali Irani (28, रा. पाटील इस्टेट, महात्मा गांधी वसाहत, पाटकर प्लॉट नं. 8, शिवाजीनगर, पुणे) याला पोलिसांनी अटक करून त्याच्याकडून 40 हजार रूपये किंमतीचे मोबाईल हॅन्डसेट जप्त केले आहेत. त्याने मुंढवा, हडपसर आणि वानवडी येथुन बसमधील व पायी जाणार्‍या महिलांच्या बॅगेतून जबरदस्तीने मोबाईल चोरल्याची कबुली दिली आहे.

 

आरोपींकडून हडपसर पोलिस ठाण्यात (Hadapsar Police Station) दाखल असलेले 3, यवत पोलिस स्टेशन (Yavat Police Station), भारती विद्यापीठ पोलिस स्टेशन (Bharti Vidyapeeth Police Station) आणि सहकारनगर पोलिस ठाण्यातील (Sahakar Nagar Police Station) प्रत्येकी 1 तसेच मुंढवा पोलिस ठाण्यात (Mundhwa Police Station) दाखल असलेले 3 मोबाईल चोरीचे गुन्हे उघडकीस आले आहेत.

सदरची कारवाई पोलिस आयुक्त रितेश कुमार (IPS Ritesh Kumar), सह पोलिस आयुक्त संदीप कर्णिक (IPS Sandeep Karnik), अप्पर पोलिस आयुक्त रामनाथ पोकळे (IPS Ramnath Pokale),
पोलिस उपायुक्त अमोल झेंडे (DCP Amol Zende), सहाय्यक पोलिस आयुक्त सतीश गोवेकर (ACP Satish Govekar)
यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिस निरीक्षक उल्हास कदम (PI Ulhas Kadam),
सहाय्यक पोलिस निरीक्षक कृष्णा बाबर (API Krishna Babar),
पोलिस उपनिरीक्षक अविनाश लोहटे (PSI Avinash Lahote), पोलिस उपनिरीक्षक चैताली गपाट (PSI Chaitali Gapat),
पोलिस अंमलदार रमेश साबळे, दया शेगर, प्रमोद टिळेकर, शहाजी काळे, राजस शेख,
विनोद शिवले, शशिकांत नाळे, राहुल ढमढेरे, विलास खंदारे आणि राहुल होळकर यांच्या पथकाने केली आहे.

 

Web Title :  Pune Police Crime Branch News | The crime branch arrested those who
forcibly stole mobile phones, 9 crimes were solved

 

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

 

हे देखील वाचा