Pune Cyber Crime News | पुण्यातील एफसी रोडवरील युनियन बँकेला सायबर गुन्हेगारांकडून 23 लाखांचा गंडा

पुणे : पोलीसनामा ऑनलाइन – Pune Cyber Crime News | स्कायमोटो ऑटो मोबाईल प्रा. लि. कंपनीचा (Skymoto Auto Mobile Pvt. Ltd. Company) संचालक बोलत असल्याचे सांगून कंपनीच्या ईमेल आयडीप्रमाणे हुबेहूब बनावट ईमेल व लेटरहेड तयार करुन ते बँकेला पाठवले. त्यानंतर बँकेला 22 लाख 92 हजार 746 रुपये ट्रान्सफर करायला सांगत बँकेची फसवणूक (Cheating Fraud Case) केल्याचा प्रकार उघडकीस आला आहे. हा प्रकार 4 जानेवारी 2022 फर्ग्युसन कॉलेज रोडवरील युनियन बँकेच्या (Union Bank Ferguson College Road) शिवाजीनगर शाखेत घडला आहे. याबाबत बँकेने तक्रार अर्ज दाखल केला होता. या अर्जाचा तपास करुन पोलिसांनी (Pune Police) सायबर गुन्हेगारावर (Pune Cyber Crime News) फसवणुकीचा गुन्हा दाखल केला आहे.

याप्रकरणीअवनिकांत निरंजन सामंतराय (वय-37 रा. कोरेगाव पार्क, पुणे) यांनी शिवाजीनगर पोलीस ठाण्यात (Shivajinagar Police Station) फिर्याद दिली आहे. त्यानुसार 98991XXXXX मोबाईल धारक, आयसीआयसीआय व अॅक्सिस बँक खाते धारकांवर आयपीसी 419, 420, 465, 468, 471, 34 सह आयटी अॅक्ट नुसार गुन्हा दाखल केला आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्य़ादी हे युनियन बँकेच्या शिवाजीनगर शाखेत शाखाधिकारी म्हणून काम करतात. त्यांच्या शाखेत स्कायमोटो ऑटोमोबाईल प्रा. लि. कंपनीचे खाते आहे. सामंतराय यांना 4 जानेवारी रोजी दुपारी एका अज्ञात मोबाईल क्रमांकावरुन फोन आला. समोरच्या व्यक्तीने स्कायमोटो ऑटो प्रा. लि. कंपनाचा संचालक विवेक सावंत बोलत असल्याचे सांगितले. संबंधित व्यक्तीने अर्जंट पैसे ट्रान्सफर करुन हवे असल्याचे सांगितले. त्याने पैसे हवे असल्याचे कंपनीच्या लेटरहेडवर विथड्रोल रिक्वेस्ट पाठवत असल्याचे सांगितले. (Pune Cyber Crime News)

त्यानुसार स्कायमोटो ऑटोमोबाईल प्रा. लि. कंपनीच्या ईमेल आयडीशी मिळत्याजुळत्या बनावट ईमेल आयडीवरुन बनावट लेटरहेडवर पैसे पाठविण्यासाठीचे पत्र बँकेच्या ईमेलवर पाठवले.
त्यावर विविध बँकेच्या खात्यावर पैसे पाठवण्यास सांगितले. त्यावरील सही देखील संचालकांच्या सह्यांशी हुबेहूब जुळत होत्या.
त्यामुळे फिर्यादी यांचा विश्वास बसल्याने त्यांनी सायबर चोरट्यांनी दिलेल्या बँक खात्यावर 22 लाख 92 हजार 746 रुपये पाठवले.

त्यानंतर कंपनीतून बँकेत फोन आला. कंपनीने अशा प्रकारचा व्यवहार केला नसल्याचे सांगितले.
तसेच कंपनीकडून कोणत्याही प्रकारचा मेल अथवा लेटरहेडवर पैशाची मागणी केली नसल्याचे सांगण्यात आले.
त्यानंतर बँकेने पडताळणी केली असता ईमेल आणि लेटरहेड बनावट असल्याचे समोर आले.
फसवणूक झाल्याचे लक्षात येताच बँकेने याबाबत तक्रार अर्ज शिवाजीनगर पोलीस ठाण्यात दिला.
पुढील तपास पोलीस निरीक्षक गुन्हे विक्रम गौड (PI Vikram Goud) करीत आहेत.

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

हे देखील वाचा

Dr Abhijeet Natu | भारतीय कला प्रसारणी सभेच्या वस्तुविद्या महाविद्यालयाच्या प्राचार्य पदी डॉ अभिजित नातु