Pune Cyber Crime | पुण्यात ‘टाटा मोटर्स’च्या नावाने अनेक बेरोजगार तरुणांची फसवणूक

पुणे : पोलीसनामा ऑनलाइन – टाटा मोटर्स (Tata Motors) कंपनीमध्ये नोकरी (Job) लावण्याचे आमिष दाखवून काही जणांनी मुरुड (Murud) येथील एका तरुणाची पुण्यात (Pune Cyber Crime) फसवणूक (Fraud) केल्याचा प्रकार उघडकीस आला आहे. याच पद्धतीने 15 युवकांची फसवणूक झाल्याबाबत पुणे सायबर क्राईमकडे (Pune Cyber Crime) तक्रार करण्यात आली आहे. याप्रकरणी ग्राहक पंचायतीकडे तक्रार आल्यावर त्यांनी थेट टाटा मोटर्स कंपनीत संपर्क साधला. त्यावेळी या तरुणांची फसवणूक झाल्याचे लक्षात आले.

 

ग्राहक पंचायतीचे (Grahak Panchayat) पदाधिकारी विलास लेले (Vilas Lele) यांनी याबाबत माहिती दिली. मुरुडहून पुण्यात आलेल्या एका युवकाला टाटा मोटर्समध्ये स्टोअर किपरची (Store keeper) नोकरी असल्याचा फोन आला. त्यासाठी अर्जाचे 1500 रुपये जमा करण्यास सांगितले. त्यानंतर परीक्षा शुल्क (Exam fee), प्रशिक्षण शुल्क (training fee) अशा वेगवेगळ्या कारणाने त्याच्याकडून 9 वेळा पैसे घेतले. अखेरीस या तरुणाने तक्रार करण्याची धमकी दिल्यावर त्याला टाटा मोटर्सच्या प्रवेशद्वारावर भेटण्यास बोलावले. त्याठिकाणी तुला लॅपटॉप (Pune Cyber Crime) देण्यात येणार असल्याचे सांगून पुन्हा पैसे घेतले व भेटायला बोलवणारा गायब झाला.

 

फसवणूक झालेल्या युवकाच्या आत्याने त्याला पंचायतीकडे तक्रार करण्याचा सल्ला दिला, अशी माहिती लेले यांनी दिली. तक्रारदार आल्यावर लेले यांनी थेट टाटा मोटर्सच्या व्यवस्थापकांबरोबर संपर्क साधला. त्यावेळी त्यांनी नोकरीसाठी म्हणून कोणतीही जाहिरात प्रसिद्ध करण्यात आली नसल्याचे सांगितले. तसेच रोज काही युवक याबाबत विचारणा करण्यासाठी येत असल्याने त्यांना प्रवेश नाकारून कंपनीच्या संकेतस्थळावर नोकरी नाही, असे निवेदन देखील प्रसिद्ध करण्यात आल्याची माहिती त्यांनी दिली.

 

तरुणांनी सावधगिरी बाळगावी

लेले यांनी सांगितले की, तरुणांनी नोकरीसाठी प्रयत्न करत असताना आपल्याला कोणी फसवत तर नाही ना याची सावधगिरी बाळगावी.
15 जणांकडून नोकरी लावण्याच्या आमिषाने पैसे घेण्यात आले. फसवणूक झालेल्या तरुणाला आलेले फोन कॉल, मोबाईल क्रमांक,
ज्या खात्यामध्ये पैसे जमा केले तो खाते क्रमांक, कंपनीच्या प्रवेशद्वारावर भेटलेल्या व्यक्तीचा
नंबर व चेहरेपट्टी अशी सर्व माहिती सायबर गुन्हे शाखेला (Pune Cyber Crime) देऊन तक्रार करण्यात आली आहे.

 

Web Title :- Pune Cyber Crime | unemployed youth cheated name tata motor case registered in pune cyber crime police station

 

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

हे देखील वाचा

Maharashtra Weather | राज्यात अल्हाददायक थंडीची चाहूल ! विदर्भात पावसाचा अंदाज

WhatsApp चा दिवाळी धमाका ! कंपनीकडून 255 रुपये ‘कॅशबॅक’ची ऑफर, जाणून घ्या कसा घ्यावा लाभ

Pune Crime | धक्कादायक ! पुण्यात 52 वर्षाच्या शिक्षकानं 15 वर्षीय मुलीला नेलं टेरेसवर, बलात्कार करून अनैसर्गिक कृत्य केल्याचा प्रकार उघडकीस