Coronavirus : पुणे जिल्हयात गेल्या 24 तासात ‘कोरोना’चे तब्बल 4014 नवे पॉझिटिव्ह, जाणून घ्या सातारा, सांगली, सोलापूर आणि कोल्हापूरची आकडेवारी

पुणे : पोलीसनामा ऑनलाइन  –   पुणे विभागातील 41 हजार 541 कोरोना बाधित रुग्ण बरे होऊन घरी गेले असून विभागात कोरोना बाधीत रुग्णांची संख्या 70 हजार 701 झाली आहे. तर ॲक्टीव रुग्ण 27 हजार 130 आहे. विभागात कोरोनाबाधीत एकुण 2 हजार 30 रुग्णांचा मृत्यू झाला आहे. तसेच 824 रुग्ण गंभीर असून उर्वरीत निरीक्षणाखाली आहेत. पुणे विभागामध्ये बरे होणा-या रुग्णांचे प्रमाण 58.76 टक्के आहे. तर मृत्यूचे प्रमाण 2.87 टक्के इतके आहे, अशी माहिती विभागीय आयुक्त डॉ.दीपक म्हैसेकर यांनी दिली.

यापैकी पुणे जिल्हयातील 58 हजार 27 बाधीत रुग्ण असून कोरोना बाधित 36 हजार 27 रुग्ण बरे होवून घरी गेले आहेत. ॲक्टीव रुग्ण संख्या 20 हजार 545 आहे. यामध्ये पुणे महानगरपालिका क्षेत्रातील 14 हजार 748, पिंपरी चिंचवड महानगरपालिका क्षेत्रातील 3 हजार 813 व पुणे कॅन्टोंन्मेंट 257, खडकी विभागातील 46, ग्रामीण क्षेत्रातील 1 हजार 581, जिल्हा शल्य चिकीत्सक यांच्याकडील 100 रुग्णांचा समावेश आहे.

पुणे जिल्हयात कोरोनाबाधित एकूण 1 हजार 455 रुग्णांचा मृत्यू झाला आहे. यामध्ये पुणे महानगरपालिका क्षेत्रातील 1 हजार 61, पिंपरी चिंचवड महानगरपालिका क्षेत्रातील 236 व पुणे कॅन्टोंन्मेंट 29, खडकी विभागातील 27, ग्रामीण क्षेत्रातील 68, जिल्हा शल्य चिकीत्सक यांच्याकडील 34 रुग्णांचा समावेश आहे. तसेच 593 रुग्ण गंभीर असून उर्वरित निरीक्षणाखाली आहेत. पुणे जिल्हयामध्ये बरे होणा-या रुग्णांचे प्रमाण 62.09 टक्के आहे. तर मृत्यूचे प्रमाण 2.51 टक्के इतके आहे.

कालच्या बाधीत रुग्णांच्या संख्येच्या तुलनेत पुणे विभागात बाधीत रुग्णांच्या संख्येमध्ये एकूण 4 हजार 712 ने वाढ झाली आहे. यामध्ये पुणे जिल्ह्यात 4 हजार 14, सातारा जिल्ह्यात 76, सोलापूर जिल्ह्यात 300, सांगली जिल्ह्यात 40 तर कोल्हापूर जिल्ह्यात 282 अशी रुग्ण संख्येमध्ये वाढ झालेली आहे.

सातारा जिल्हयातील कोरोना बाधीत 2 हजार 630 रुग्ण असून 1 हजार 32 बाधित रुग्ण बरे होवून घरी गेले आहेत. ॲक्टीव रुग्ण संख्या 1 हजार 510 आहे. कोरोनाबाधित एकूण 88 रुग्णांचा मृत्यू झाला आहे.

सोलापूर जिल्हयातील 6 हजार 129 कोरोना बाधीत रुग्ण असून 2 हजार 975 बाधित रुग्ण बरे होवून घरी गेले आहेत. ॲक्टीव रुग्ण संख्या 2 हजार 769 आहे. कोरोना बाधित एकूण 385 रुग्णांचा मृत्यू झाला आहे.

सांगली जिल्हयातील कोरोना बाधीत 1 हजार 103 रुग्ण असून 439 बाधित रुग्ण बरे होवून घरी गेले आहेत. ॲक्टीव रुग्ण संख्या 627 आहे. कोरोना बाधित एकूण 37 रुग्णांचा मृत्यू झाला आहे.

कोल्हापूर जिल्हयातील 2 हजार 812 कोरोना बाधीत रुग्ण असून 1 हजार 68 बाधित रुग्ण बरे होवून घरी गेले आहेत. ॲक्टीव रुग्ण संख्या 1 हजार 679 आहे. कोरोना बाधित एकूण 65 रुग्णांचा मृत्यू झाला आहे.

आजपर्यत विभागामध्ये एकुण 3 लाख 49 हजार 172 नमूने तपासणीसाठी पाठविण्यात आले होते, त्यापैकी 3 लाख 45 हजार 295 नमुन्यांचा अहवाल प्राप्त झाला आहे. तर 3 हजार 877 नमून्यांचा अहवाल प्रतीक्षेत आहे. प्राप्त अहवालांपैकी 2 लाख 73 हजार 844 नमून्यांचा अहवाल निगेटीव्ह आहे. तर 70 हजार 701 चा अहवाल पॉसिटिव्ह आहेत. ( टिप :- दि. 22 जुलै 2020 रोजी दुपारी 03 वा. पर्यंतच्या आकडेवारीनुसार )