‘एल्गार’वरुन नवं ‘राजकारण’ ! CM उद्धव ठाकरेंच्या भूमिकेवर शिवसेनेचे ‘मित्र’ पक्ष ‘नाराज’

मुंबई : पोलीसनामा ऑनलाइन – एल्गार परिषदेचा तपास राष्ट्रीय तपास संस्थेच्या (NIA) माध्यमातून होणार असल्याने राज्यातील महाविकास आघाडीमध्ये नवे राजकारण सुरु झाल्याचे चित्र पहायला मिळत आहे. एल्गार परिषदेचा तपास NIA कडे देण्याच्या मुख्यमंत्र्यांच्या निर्णयावरून महाविकास आघाडीमधील मित्र पक्ष असलेल्या काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेस यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंवर नाराजी व्यक्त केली आहे.

एल्गार परिषदेचा तपास एनआयए देण्यास राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार आणि काँग्रेस प्रदेशाध्यक्ष बाळासाहेब थोरात यांनी नाराजी व्यक्त केली आहे. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी एल्गार परिषदेचा तपास एनआयएच्या माध्यमातून करण्यास परवानगी दिल्यानंतर महाविकास आघाडीतील दोन मित्र पक्षांनी मात्र नाराजी व्यक्त केली आहे. एल्गार परिषदेचा तपास करताना त्यांचा अपराध नाही त्यांच्यावरही गुन्हे दाखल केले आहेत. विनाकारण अनेकांवर या प्रकरणात गुन्हे दाखल केले आहेत.

राज्यातील विशेष तपास पथकामार्फत समांतर तपास करावा यासाठी आग्रह आहेत. तत्कालीन गृहमंत्री यांनी पोलिसांवर दबाव वाढवत काही जणांना गुंतवले आहे का, हे भविष्यात स्पष्ट होईल. अशा स्वरुपात भूमिका अध्यक्ष शरद पवार यांनी घेतली आहे, तर दुसरीकडे काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष बाळासाहेब थोरात यांनी जोरदार प्रसिद्धीसाठी तपास एनआयए कडून करणे म्हणजे राज्यातील पुरोगामी अनेकांवर विनाकारण अन्याय होणार नाही ना, असे म्हटले आहे.

काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेसच्या नेत्यांनी नाराजी व्यक्त केली असली तरी देखील मुख्यमंत्री मात्र स्वत:च्या भूमिकेवर ठाम आहेत. एल्गार परिषदेचा तपास आणि भीमा कोरेगाव प्रकरण हे दोन वेगळे आहेत. भीमा कोरेगाव प्रकरण हे दलित समाजाशी निगडित असून दलितांवर कोणताही अन्याय सरकार करणार नाही, अशी भूमिका मुख्यमंत्र्यांनी घेतली आहे.