Pune : प्रेयसी रिक्षाचालकासोबत पळून गेल्यामुळे ‘तो’ फक्त चोरायचा रिक्षाचालकांचेच मोबाईल

पोलीसनामा ऑनलाईन टीम – प्रेयसी रिक्षाचालकासोबत पळून गेल्यामुळे एका तरुणाने सर्व रिक्षाचालकांचा सूड घेण्यासाठी त्यांचे मोबाईल चोरायचा उद्योग केला आहे. संबंधिताला पोलिसांनी कॅम्प परिसरातून अटक केली आहे. आसिफ उर्फ भूराभाई अरिफ शेख (मूळ, रा. अहमदाबाद) असे त्याचे नाव आहे.

अहमदाबादचा रहिवासी असलेल्या आसिफला प्रेयसीसोबत लग्न करायचे होते. लग्नाला घरातल्यांचा विरोध असतानाही त्याने अहमदाबादमधील रेस्टॉरंट विकले. त्यानंतर त्याने गेल्या वर्षी जून महिन्यात प्रेयसीसोबत लग्न करण्यासाठी पुण्यामध्ये पळून आला. प्रेयसीसोबत लग्न करुन नवीन बिजनेस सुरू करण्याचा त्याचा विचार होता. पण दोन दिवसांमध्येच ती तरुणी आसिफकडील पैसे व अन्य सामानासह पुन्हा गुजरातला पळून गेली. तिचा शोध घेत आसिफ गुजरातला पोहोचला, पण तिने एका रिक्षाचालकासोबत लग्न केल्याचे त्याला कळले. त्यानंतर आसिफ पुन्हा पुण्याला येउन कोंढव्यात राहणार्‍या त्याच्या एका नातेवाईकासह काम करण्यास सुरुवात केली. पण त्याच्या मनात रिक्षाचालकांबाबत कटुता निर्माण झाली होती. त्यामुळे रिक्षाचालकांना धडा शिकवण्यासाठी त्याने त्यांचे मोबाईल चोरायला सुरूवात केली. त्याने कात्रज, कोंढवा, कॅम्प अशा परिसरात रिक्षाने प्रवास करायचा. गर्दीच्या ठिकाणी जाऊन रिक्षा थांबवल्यावर मोबाइल खराब असल्याचे सांगत तो रिक्षाचालकाकडे मित्राला फोन करण्यासाठी त्याचा मोबाइल मागायचा. नंतर फोनवर बोलण्याचा बहाणा करत रिक्षापासून काही अंतर चालत जाऊन पळून जायचा.