Pune : आंबेगाव येथील कचरा प्रकल्पाला पेटवून दिल्याप्रकरणी 20 जणांविरूध्द FIR

पुणे : पोलिसनामा ऑनलाइन – आंबेगाव परिसरात पालिकेने नव्याने सुरू केलेल्या कचरा प्रकल्पातील कचरा पेटवून देत पोकलेन यंत्राची तोडफोड केल्याप्रकरणी १५ ते २० जणांविरोधात गुन्हा दाखल केला आहे.

याप्रकरणी मिलींद पवार (वय ३१, रा. हडपसर) यांनी फिर्याद दिली आहे.

त्यानुसार भारती विद्यापीठ पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आंबेगाव परिसरात महापालिकेने ओल्या कचरा प्रक्रिया करण्याचा प्रकल्प उभा केला आहे. संबंधित प्रकल्पाला स्थानिकांसह राजकीय पक्षाच्या काही नगरसेविकाचा विरोध आहे. त्याच रागाातूून रविवाारी दुपारी 15 ते 20 जणांनी कचरा प्रकल्पात आग लावून पोकलेन यंत्राची तोडफोड केली. मिलींद पवार यांच्या मालकीचे पोकलेन असून त्याचे नुकसान, तोडफोड केल्यामुळे त्यांनी फिर्याद दिली आहे. अधिक तपास सहायक निरीक्षक ए. आर. कवठेकर करत आहेत.