Pune Fire | पुण्याच्या उत्तमनगरमधील ‘थिनर’च्या साठ्याला भीषण आग; दोघे भाडेकरु जखमी, 2 लक्झरी बसगाड्या जळून खाक (व्हिडीओ)

पुणे : Pune Fire | उत्तमनगर येथील कोपरे गावाजवळील (News kopare gaon uttamnagar) एका बस गॅरेजच्या शेजारी साठा करुन ठेवलेल्या थिनरच्या बॅरेलच्या साठ्याला भीषण आग लागली. त्यात तेथे असणारे दोघे भाडेकरु जखमी झाले आहेत. या आगीमध्ये या शेडबाहेर उभ्या असलेल्या दोन लक्झरी बसगाड्या जळून खाक झाल्या असून शेडमधील 15 ते 20 बॅरेल जळून गेले. सुमारे 2 तासात ही आग भडकत (Pune Fire) होती.

याबाबत अग्निशमन दलाकडून (fire brigade) मिळालेल्या माहितीनुसार, कोपरे गावाजवळ (News kopare gaon uttamnagar) एका बस गॅरेजच्या शेजारी एका शेडमध्ये थिनरचा बेकायदेशीरपणे मोठा साठा करुन ठेवण्यात आला होता. शनिवारी रात्री साडेअकरा वाजण्याच्या सुमारास या शेडमधील या साठ्याला आग लागली. त्यात येथील दोघे भाडेकरु भाजले असून त्यांच्यावर ससून रुग्णालयात उपचार करण्यात येत आहे.

Pune Fire | A huge fire at the Thinner stock in Uttamnagar, Pune; Two tenants injured, 2 luxury buses burnt to ashes (video)

 

 

या ठिकाणी थिनरचे 15 ते 20 बॅरेल एकमेकांना लागून ठेवण्यात आले होते. या आगीचा भडका होऊन शेड या बॅरलवर कोसळले होते. सिंहगड रोडवरील अग्निशमन केंद्राची पहिली गाडी घटनास्थळी पोहचली. या गाडीवर अधिकारी नसल्याचे समजते. जवानांनी आग पाहून तातडीने पाणी मारण्यास सुरुवात केली. मात्र, आग विझण्याऐवजी ती अधिकच भडकली. तोपर्यंत इतर केंद्रावरील गाड्या घटनास्थळी पोहचल्या. पाणी मारणे थांबून फोमचा समावेश असलेला मारा सुरु करण्यात आला. परंतु, जळणार्‍या बॅरेलवर शेडचे पत्रे पडले असल्याने फोमचा उपयोग होत नव्हता. तेव्हा अग्निशमन दलाच्या जवानांनी आग सुरु असतानाच हे पत्रे हुकाच्या सहाय्याने बाजूला केले. तोपर्यंत आगीने रौद्र रुप धारण केले होते. ही आग शेजारील बस गॅरेजमध्ये पोहचून तेथील इलेक्ट्रीक साहित्य जळून खाक झाले. या शेडच्या बाहेर उभ्या असलेल्या दोन लष्करी बसला झळ बसली असून त्यात त्यांचे मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले आहे.

ही जागा गायकवाड यांच्या मालकीची असून त्यांनी ती दोघांना भाड्याने दिली आहे. मात्र, तेथे काय व्यवसाय चालू होता, इतक्या बॅरेलचा साठा कशासाठी केला होता, याची त्यांना काही माहिती नाही. भाजलेल्या दोघांवर ससून रुग्णालयात उपचार करण्यात येत असून आग कशी लागली, हे त्यांच्या जबाबातून समोर येऊ शकणार आहे.

हे देखील वाचा

International Call Fraud | ALERT ! ‘नो नंबर’ म्हणजे संकट, चुकूनही ‘रिसीव्ह’ करू नका असा कॉल, होऊ शकते मोठे नुकसान; जाणून घ्या

Modi Government | मोदी सरकारने लाँच केले ‘पीएम दक्ष पोर्टल’ ! रोजगाराला चालना देण्यासाठी दिले जाईल ‘कौशल्य’ प्रशिक्षण, जाणून घ्या कुणाला मिळणार लाभ

ट्विटर ला देखील फॉलो करा

फेसबुक ला लाईक करा

Web Titel :  Pune Fire | A huge fire at the Thinner stock in Uttamnagar, Pune; Two tenants injured, 2 luxury buses burnt to ashes (video)

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update