Pune Fire | पुणे कॅम्प भागातील अनाथलयात आग, मध्यरात्रीची घटना; 100 मुलांची सुखरुप सुटका

पुणे : पोलीसनामा ऑनलाइन – सोमवारी मध्यरात्री पावणे एकच्या सुमारास वाजता ईस्ट स्ट्रीट येथील तय्यबीया मुलांचे अनाथ आश्रमात (Tayyabia Children’s Orphanage) आग (Pune Fire) लागली. अग्निशमन दलाने (Pune Fire Brigade) अनाथालयातील 100 मुलांना सुखरुप बाहेर काढले. आग (Pune Fire) लागल्याची माहिती अग्निशमन दल नियंत्रण कक्षात मिळताच मुख्यालयातील एक अग्निशमन वाहन व देवदूत वाहन तसेच पुणे कॅन्टोमेंट अग्निशमन वाहन घटनास्थळी दाखल झाले.
अनाथालय चार मजली आहे. आगीमुळे मोठ्या प्रमाणात धूर झाल्याने मुले घाबरली होती. जवानांनी तातडीने इमारतीत असणाऱ्या जवळपास 100 मुलांना (वय 6 ते 16 वर्षे) आग व धूर यापासून सुरक्षित ठिकाणी सुखरूप हलवले. त्यामुळे मोठा अनर्थ टळला. त्याचवेळी आगीवर पाण्याचा मारा करत अवघ्या दहा मिनिटात आग आटोक्यात आणली. अनाथलयातील तळमजल्यावर धान्याचा साठा तसेच इतर साहित्य होते. आगीमुळे धान्याचा साठा व इतर साहित्याचे नुकसान झाले. ही आग शॉर्ट सर्किटमुळे लागल्याची शक्यता अग्निशमन दलाकडून व्यक्त करण्यात आली.
या कामगिरीत पुणे अग्निशमन दलाचे अग्निशमन अधिकारी प्रदीप खेडेकर, वाहन चालक अतुल मोहिते,
तांडेल – चंद्रकांत गावडे व जवान आझीम शेख, गौरव कांबळे तर पुणे कॅन्टोमेंट अग्निशमन दलाचे तांडेल – आसिफ शेख,
वाहनचालक ओंकार ससाणे व जवान प्रमोद चव्हाण, कुंडलित गायकवाड, सचिन भगत, निखिल जगताप,
पंकज रसाळ यांनी सहभाग घेतला.
Web Title :- Pune Fire | Fire at orphanage in Pune camp area, midnight incident; 100 children safely rescued
Join our WhatsApp Group, Telegram, facebook page and Twitter for every update
MNS Chief Raj Thackeray | राज ठाकरे पुणे दौऱ्यावर, वसंत मोरेंची नाराजी दूर होणार?