Pune Fire News | विश्रांतवाडी, फुलेनगर आरटीओ कार्यालयाच्या आवारातील 10 वाहनांना भीषण आग, 4 कार, 4 लक्झरी बस,1 टेम्पो व एक डंपर अशी एकूण 10 वाहने जळून खाक (Video)

पुणे : पोलीसनामा ऑनलाइन – Pune Fire News | विश्रांतवाडी, फुलेनगर आरटीओ (Pune RTO) कार्यालयाच्या आवारात जप्त केलेल्या वाहनांना आज (रविवार) दुपारी भीषण आग (Vehicle Fire) लागली. घटनेची माहिती मिळताच पुणे अग्निशमन दलाने (Pune Fire Brigade) घटनास्थळी धाव घेत पाण्याचा फवारा मारुन आग (Pune Fire News) विझवली. या दुर्घटनेत 4 कार, 4 लक्झरी बस,1 टेम्पो व एक डंपर अशी एकूण 10 वाहने जळून खाक झाले आहेत. ही दुर्घटना दुपारी पावणे एकच्या सुमारास घडली.

 

 

आगीच्या घटनेची वर्दी मिळताच पुणे अग्निशमन दलाच्या 3 फायर गाड्या आणि 2 वॉटर टँकर घटनास्थळी दाखल झाले. अग्निशमन दलाच्या जवानांनी पाणी मारुन काही वेळात आगीवर नियंत्रण (Pune Fire News) मिळवले. या घटनेत कोणतीही जीवीत हानी झालेली नाही. ही आग कशामुळे लागली हे अद्याप समजू शकले नाही.

 

अग्निशमन दलाचे अधिकारी निलेश महाजन (Nilesh Mahajan) यांनी दिलेल्या माहितीनुसार,
आज दुपारी 12.45 वाजता विश्रांतवाडी, फुलेनगर आरटीओ कार्यालयाच्या आवारामध्ये पार्क करण्यात आलेल्या वाहनांना आग लागली.
या दुर्घटनेत 4 कार, 4 लक्झरी बस, 1 टेम्पो व 1 डंपर अशी एकूण 10 वाहनांनी पेट घेतला.
आगीची माहिती मिळताच अग्निमन दलाच्या 3 फायर गाड्या आणि दोन वॉटर टँकर घटनास्थळी रवाना झाले.
20 जवानांनी पाण्याचा फवारा मारुन काही वेळात आग नियंत्रणात आली.
ही आग कशामुळे लागली हे समजू शकले नाही. सध्या याठिकाणी कुलींगचे काम सुरु आहे.

 

Web Title :- Pune Fire News | A total of 10 vehicles including 4 cars, 4 luxury buses, 1 tempo and a dumper were burnt down in the premises of Vishrantwadi, Phulenagar RTO office.

 

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

 

हे देखील वाचा

 

Ajit Pawar | ‘माझी महिलांना विनंती आहे, जास्त पलटण वाढवू नका’, अजित पवारांचा सल्ला अन् एकच हश्शा

Nepal Plane Crash | नेपाळमध्ये यती एअरलाइन्सचे विमान कोसळलं, 32 जणांचा मृत्यू, मृतांची संख्या वाढण्याची शक्यता

Pune Crime News | लग्नाचे आमिष दाखवून शारीरीक संबंधाचे फोटो नातेवाईकांमध्ये केले व्हायरल