Pune Fire News | फटाक्यामुळे औंधमध्ये संपूर्ण फ्लॅट जळून खाक; लक्ष्मीपूजनानंतरच्या आतिषबाजीत १७ ठिकाणी आगी

पुणे : Pune Fire News | लक्ष्मी पूजनानंतर (Lakshmi Pooja) शहरात झालेल्या फटाक्यांच्या अतिषबाजीत वेगवेगळ्या १७ ठिकाणी आगी लागल्या. त्यात औंध येथील डी पी रोडवरील एका सोसायटीतील पहिल्या मजल्यावरील चार बी एच के फ्लॅटमध्ये आग लागली. त्यात फ्लॅट संपूर्ण जळून खाक झाले. फटाक्यामुळे दुचाकी, दुकाने, कचरा, झाडांना आगी (Pune Fire News) लागल्याच्या घटना घडल्या. त्यात कोणीही जखमी झाले नाही.

औंध येथील डि पी रोडवरील टेरेसा सोसायटीत (Teresa Society Aundh) पहिल्या मजल्यावरील चार बी एच के फ्लॅटमध्ये रात्री १० वाजून २९ मिनिटांनी आग लागली होती. ही सोसासटी पार्किंग अधिक १२ मजली आहे. अग्निशमन दलाच्या (Fire Brigade) औंध, एरंडवणा, कसबा, कोथरुड, व पीएमआरडीएच्या फायर गाड्या व एक वॉटर टँकरच्या मदतीने ही आग पूर्णपणे विझवली. यावेळी धुराचे प्रमाण अधिक असल्याने वर राहणार्‍या ३० ते ३५ नागरिकांना टेरेसवर सुखरुप नेण्यात आले होते. आग विझविताना बी ए सेट परिधान करुन दोन पथकांनी प्रत्येक फ्लॅटचा दरवाजा वाजवून पुन्हा पुन्हा सर्च करत होते. आग नियंत्रणात आल्यावर पोलिसांसमवेत पुन्हा एकदा सर्वे करण्यात आला. त्यात सोसायटीतील सर्व ४० फ्लॅटमधील नागरिक सुरक्षित असल्याची खात्री करण्यात आली. आगीमध्ये (Pune Fire News) हा फ्लॅट पूर्णपणे जळाला. फटाक्यामुळे आग लागली असल्याचे प्रत्यक्षदर्शीचे म्हणणे आहे. अग्निशमन अधिकारी राजेश जगताप (Fire Officer Rajesh Jagtap) यांनी ही माहिती दिली. चार स्टेशनचे अधिकारी आणि ३० ते ३५ जवानांनी या कारवाईत सहभाग घेतला.

लक्ष्मीपूजनानंतर झालेल्या आतषबाजीत सर्वप्रथम जनता वसाहतीतील गल्ली क्रमांक ४७ मधील एका झाडाला आग लागली

– कात्रज, आंबेगाव पठार येथील साई सिद्धी चौकाजवळील एका गॅलरीमध्ये आग लागली.
– बी टी कवडे रोडवरील सिटाडेल इनक्लेव्ह या सोयायटीत लागलेल्या आगीत ७ दुचाकी पेटल्या.
– मानाजीनगर येथील ज्ञानदेव शाळेच्या छतावर आग लागली होती.
– विश्रांतवाडी मधील सिरीन हॉस्पिटलजवळ झाडाला आग़
– वारजे माळवाडीतील चैतन्य चौकाजवळी युनिव्हर्सल सोसायटीत बंद घरामध्ये आग़
– सिंहगड रोडवरील शारदा मठाजवळील श्वेता सोसायटीत नारळाच्या झाडाला आग
– गुरुवार पेठेतील शितळादेवी चौकातील जुन्या वाड्यामध्ये आग
– लोहगाव येथील अंबानगरीतील लटेरिया सोसायटीत आग
– वडगाव शेरीत टेम्पो चौकातील झाडाला आग
– खडक पोलीस ठाण्याजवळील लाकडी गणपतीजवळ गॅलरीमध्ये आग
– औंध येथील डि पी रोडवरील टेरेजा सोसायटीतील घरामध्ये आग
– सिंहगड रोड संतोष हॉलमागील नारळाच्या झाडाला आग
– बालेवाडी येथील दत्त मंदिराजवळील एका दुकानामधून धूर
– शनिवार पेठेतील नाना नानी पार्क येथे कचर्‍याला आग
– भांडारकर इन्स्टिट्युटजवळ बुलेट गाडीला आग
– बुधवार पेठेतील तपकीर गल्लीमध्ये दुकानाला आग

Web Title :- Pune Fire News | Firecrackers burn entire flat in Aundh; 17 places caught fire in the fireworks after Lakshmi Puja

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

हे देखील वाचा