Pune Fog | धुक्यात हरविली शहरे ! दाट धुक्यामुळे विमान सेवा ठप्प आणि वाहतूक संथ

पुणे : पोलीसनामा ऑनलाइन – Pune Fog | अरबी समुद्रात निर्माण झालेल्या कमी दाबाच्या पट्ट्यामुळे गेले दोन दिवस हिवाळ्यात पावसाचा अनुभव घेत असतानाच शुक्रवारी पहाटे पुण्यासह राज्यात सर्वत्र प्रचंड दाट धुके पसरले असून त्यात पुणे हरविल्याचे दिसून येत होते. दाट धुक्यांमुळे (Pune Fog) विमानसेवेवर परिणाम झाला असून अनेक विमानांची उड्डाणे उशिरा होत असून काही विमाने इतर शहरांकडे वळविण्यात आली आहेत.

 

गेले दोन दिवस राज्यात प्रामुख्याने कोकण, मध्य महाराष्ट्रात अनेक ठिकाणी जोरदार पाऊस झाला. त्यानंतर आज सकाळी सर्वत्र प्रचंड दाट धुके पसरले होते. अगदी काही मीटरवरीलही काही दिसत नव्हते. त्यामुळे महामार्गावरील वाहतूकीवर त्याचा परिणाम दिसून आला. महामार्गावर वाहनांची संख्या कमी दिसून येत असून वाहनेही सकाळ झाली तरी दिवे लावून संथपणे जाताना दिसत होती.

 

 

पुण्यातील लोहगाव विमानतळावर (Lohegaon Airport)

दृश्यमानता अतिशय कमी असल्याने त्याचा परिणाम विमानसेवेवर झाला आहे.
सकाळी अहमदाबाद, दिल्ली, चेन्नईहून येणारी विमाने दृश्यमानता नसल्याने विमानतळावर उतरु शकली नाही.
चार विमाने अन्य शहरात वळविण्यात आली.

 

अहमदाबाद -पुणे  आणि दिल्ली -पुणे ही दोन विमाने मुंबईला वळविण्यात आली आहे. तसेच चेन्नई -पुणे विमान हैदराबादला वळविण्यात आले आहे. तसेच दिल्लीहून येणारे आणखी एक विमान मुंबईकडे वळविण्यात आले आहे. लोहगाव विमानतळावरुन विमानांचे उड्डाण होऊ शकले नसून त्यांच्या वेळा पुढे ढकलण्यात आल्या आहेत.

 

शहरात आज सर्वत्र दाट धुके दिसून आले. सकाळी फिरायला जाणारेही स्वेटर घालून बाहेर पडलेले दिसून येत होते.
दाट धुके (Pune Fog) आणि आकाश ढगाने आच्छादलेले दिसत होते.
कधीही पावसाची सर येईल, असे हिल स्टेशनवर असणारे वातावरण पुणे शहरात दिसून येत होते.
सकाळी 9 वाजून गेले तरी सूर्यदर्शन झाले नव्हते.
त्यामुळे सकाळी कामाला बाहेर पडणारे वाहनचालक दिवे लावून वाहने चालविताना दिसत होते.

 

Web Title :- Pune Fog | low visibility at Pune due to fog. As a result flights are delayed or diverted for the next few hours. All passengers travelling from #PuneAirport are requested to check flight timings with their Airlines

 

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

 

हे देखील वाचा