पुण्यातील मटका क्वीन ‘रेश्मा’ला अटक, चक्क WhatsApp वर घ्यायची मटका अन्…

पुणे : पोलीसनामा ऑनलाइन  –   लॉकडाऊन काळात व्हाट्सअ‍ॅपवर मटका घेणाऱ्या एका मटका किंग महिलेला पोलिसांनी छापा टाकून पकडले. बंडगार्डन पोलिसांनी ही कारवाई केली आहे.

रेश्मा प्रताप डोगरा (वय 40, रा. ताडीवाला रस्ता) असे पकडण्यात आलेल्या महिलेचे नाव आहे. याप्रकरणी बंडगार्डन पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

शहरात सुरू असणारे अवैध धंदे बंद करण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत. मात्र तरीही छुप्या पध्दतीने शहरात धंदे सुरू आहेत. तर दुसरीकडे लॉकडाऊन काळात देखील हे प्रकार समोर येत असल्याने वरिष्ठ अधिकाऱ्यांनी ठवर कारवाई करण्याच्या सूचना दिल्या आहेत. यादरम्यान बंडगार्डन पोलिसांना ताडीवाला रस्ता परिसरात एक महिला व्हाट्सअ‍ॅपवर मटका घेत असल्याचे समजले. त्यानुसार या माहितीची खातरजमा केली. त्यानुसार वरिष्ठ निरीक्षक श्रीकांत शिंदे यांच्या मार्गदर्शनाखाली पथकाने येथे छापा टाकून महिलेला ताब्यात घेतले. तिच्याकडून 53 हजार रुपयांचे जुगार साहित्य जप्त करण्यात आले आहे. अधिक तपास बंडगार्डन पोलीस करत आहेत.

पोलीसनामा न्युज आता टेलीग्रामवर... आमचं चॅनेल (@policenamanews) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.
WhatsAPP
You might also like