Pune Ganeshotsav 2022 | पुन्हा एकदा निनादले ‘ॐ नमस्ते गणपतये…’ चे सूर

दोन वर्षांच्या कोविड संकटानंतर 31 हजार महिलांचे दगडुशेठ गणपतीसमोर अर्थवशीर्ष पठण

 

पुणे : पोलीसनामा ऑनलाइन – Pune Ganeshotsav 2022 | ॐ नमस्ते गणपतये.. त्वमेव प्रत्यक्षं तत्त्वमसि.. त्वमेव केवलं कर्तासि.. असे ३१ हजार महिलांच्या मुखातून अथर्वशीर्ष पठणाचे सामूहिक स्वर उमटले. ऋषिपंचमीच्या पहाटे श्रीमंत दगडूशेठ हलवाई गणपतीसमोर आदिशक्तीच्या मंत्रोच्चाराने वातावरण मंगलमय आले होते. कोविड संकटानंतर दोन वर्षांच्या प्रदीर्घ प्रतीक्षेनंतर यंदाच्या गणेशोत्सवात हा सोहळा गणेशभक्तांनी अनुभविला. (Pune Ganeshotsav 2022)

 

श्रीमंत दगडूशेठ हलवाई सार्वजनिक गणपती ट्रस्ट, सुवर्णयुग तरुण मंडळातर्फे ऋषिपंचमीनिमित्त पहाटे ३१ हजार महिलांनी उत्सव मंडपासमोर अथर्वशीर्ष पठण केले. गणेश नामाचा जयघोष करीत महिलांनी पहाटेच्या मंगल समयी प्रसन्नतेची अनुभूती दिली. प्रख्यात गायिका अनुराधा पौडवाल, परिमंडळ १ च्या पोलीस उपायुक्त डॉ. प्रियांका नारनवरे, ट्रस्टचे महेश सूर्यवंशी, सुवर्णयुग मंडळाचे अध्यक्ष प्रकाश चव्हाण, यतिश रासने, मंगेश सूर्यवंशी, बाळासाहेब सातपुते, माऊली रासने, उपक्रम प्रमुख शुभांगी भालेराव, अर्चना भालेराव यावेळी उपस्थित होते. अथर्वशीर्ष पठण उपक्रमाचे यंदा ३५ वे वर्ष होते. (Pune Ganeshotsav 2022)

 

अनुराधा पौडवाल म्हणाल्या, जगदगुरु शंकराचार्य रचित सौंदर्य लहरी चे पठण मी केले आहे. धर्म बळकट करण्याची आवश्यकता आहे. त्यामुळे हे पठण आपण सवार्नी एकत्रितपणे नक्की करूया, असेही त्यांनी सांगितले. डॉ. प्रियांका नारनवरे म्हणाल्या, प्रत्येक घरामध्ये असलेल्या स्त्री शक्ती मुळे चांगले संस्कार घडत आहेत. दगडूशेठ गणपती ट्रस्ट उत्तम कार्य करीत असून यामुळे इतरांना समाजासाठी काम करण्याची प्रेरणा नक्कीच मिळेल.

पारंपरिक पेहरावातील महिलांनी पहाटेपासूनच अथर्वशीर्ष पठणासाठी उत्सव मंडपासमोर गर्दी केली होती.
उत्सव मंडपापासून ते हुतात्मा चौकापर्यंतचा परिसर महिलांच्या शिस्तबद्ध रांगेने भरून गेला होता.
महिलांनी शंखनाद केल्यानंतर ॐकार जप आणि मुख्य अथर्वशीर्ष पठण करीत गणरायाला नमन केले.
हात उंचावून टाळ्यांचा गजर करीत महिलांनी गणरायाला अभिवादन केले.
ट्रस्टच्या जय गणेश पालकत्व योजनेतील विद्याथ्यार्नी स्वातंत्र्य सेनानींच्या माहितीचे फलक हातात घेऊन त्यांना अभिवादन केले.
तसेच सुवर्णयुग तरुण मंडळाची दहीहंडी फोडताना दहीहंडीला काही वेळ शौयार्ने लटकत एकटयाने दहीहंडी फोडणा- या प्रथमेश कारळे या कसबा पेठेतील गणेश मित्र मंडळाच्या गोविंदास ट्रस्टतर्फे सन्मानचिन्ह, महावस्त्र व २५ हजार रुपये देऊन सन्मानित करण्यात आले. आरतीने कार्यक्रमाची सांगता झाली.

 

Web Title :- Pune Ganeshotsav 2022 | atharvashirsha pathan at shreemant dagdusheth halwai ganpati trust

 

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

 

हे देखील वाचा

 

Rule Change | आजपासून झाले ‘हे’ 5 मोठे बदल, जाणून घ्या तुमच्या खिशावर कसा वाढला भार

 

LPG Gas Price | दिलासादायक! LPG गॅस सिलिंडरच्या दरात मोठी कपात, घरगुती ग्राहकांसाठी दर काय?, जाणून घ्या…

 

Maharashtra Rain | मुंबई, पुण्यासह ‘या’ जिल्ह्यांत वादळी वाऱ्यासह पावसाचा अंदाज