Rule Change | आजपासून झाले ‘हे’ 5 मोठे बदल, जाणून घ्या तुमच्या खिशावर कसा वाढला भार

नवी दिल्ली : वृत्तसंस्था – Rule Change From 1 September 2022 | आजपासून सप्टेंबर (September) महिना सुरू झाला असून पहिल्या तारखेपासून गॅस सिलिंडरच्या किंमतीपासून ते बँकिंग नियमांपर्यंत अनेक बदल लागू करण्यात आले आहेत (Rule Change). याशिवाय नवीन महिना अनेक अर्थाने तुमच्या खिशाला जड जाणार आहे. कारण, आता टोल टॅक्सपासून ते जमीन खरेदीपर्यंत जास्त खर्च करावा लागणार आहे. 1 सप्टेंबरपासून कोणते विशेष बदल झाले आहेत, ज्यामुळे तुमचा आर्थिक बोजा वाढणार आहे, ते जाणून घेऊया. (Rule Change)

 

1 – एलपीजीच्या किमतीत कपात

पेट्रोलियम कंपन्या दर महिन्याच्या पहिल्या दिवशी एलपीजीच्या किमतीत (lpg gas cylinder price) बदल करतात. यावेळी कंपन्यांनी ग्राहकांना दिलासा दिला आहे. एलपीजीच्या दरात 100 रुपयांनी कपात करण्यात आली आहे. व्यावसायिक एलपीजी सिलिंडरच्या किमतीत ही कपात करण्यात आली आहे. 1 सप्टेंबर 2022 पासून दिल्लीत इंडेनच्या 19 किलोच्या व्यावसायिक सिलेंडरची किंमत 91.50 रुपयांनी, कोलकात्यात 100 रुपयांनी, मुंबईत 92.50 रुपयांनी, चेन्नईमध्ये 96 रुपयांनी कमी झाली आहे. (Rule Change)

 

2 – टोल टॅक्ससाठी द्यावे लागतील जास्त पैसे

जर तुम्ही यमुना एक्सप्रेसवेने दिल्लीला जात असाल तर आजपासून तुम्हाला जास्त टोल टॅक्स भरावा लागेल. 1 सप्टेंबरपासून लागू झालेल्या नवीन दरवाढीनुसार, कार, जीप, व्हॅन आणि इतर हलक्या मोटार वाहनांसाठी टोल टॅक्सचा दर 2.50 रुपये प्रति किमीवरून 2.65 किमी करण्यात आला आहे. म्हणजेच प्रति किलोमीटर 10 पैशांची वाढ झाली आहे. (Toll Tax)

हलकी व्यावसायिक वाहने, हलकी मालवाहू वाहने किंवा मिनीबससाठी टोल टॅक्स 3.90 रुपये प्रति किमीवरून 4.15 रुपये प्रति किमी करण्यात आला आहे. बस किंवा ट्रकचा टोल दर 7.90 रुपये प्रति किमीवरून 8.45 रुपये प्रति किमी करण्यात आला आहे. यापूर्वी यमुना एक्स्प्रेस वेच्या टोल टॅक्समध्ये 2021 साली वाढ करण्यात आली होती.

 

3 – विमा प्रतिनिधींना धक्का

IRDAI ने सामान्य विम्याच्या नियमांमध्ये मोठे बदल केले आहेत. आता विमा एजंटला 30 ते 35 टक्क्यांऐवजी केवळ 20 टक्के कमिशन मिळणार आहे. यामुळे एजंटांना झटका बसला आहे, तर लोकांच्या प्रीमियमच्या रकमेत कपात होऊन मोठा दिलासा मिळणार आहे. कमिशन बदलाचा नियम 15 सप्टेंबर 2022 पासून लागू होईल.

 

4 – PNB KYC Updates ची अंतिम मुदत संपली

पंजाब नॅशनल बँक आपल्या ग्राहकांना बर्‍याच काळापासून केवायसी (Know Your Customers) अपडेट करण्यास सांगत आहे.
केवायसी अपडेट करण्याची अंतिम मुदत आजपासून संपली आहे.
हे काम पूर्ण करण्यासाठी बँकेने 31 ऑगस्ट 2022 ही अंतिम तारीख निश्चित केली होती.
बँकेने स्पष्टपणे सांगितले होते की जर तुम्ही केवायसी अपडेट केले नाही तर तुम्हाला तुमच्या खात्यातून पैशांचे व्यवहार करण्यात अडचणी येऊ शकतात.
जर तुम्ही हे काम केले नसेल तर लगेच तुमच्या शाखेशी संपर्क साधा.

 

5 – NPS च्या नियमांमध्ये मोठा बदल

1 सप्टेंबरपासून राष्ट्रीय पेन्शन योजनेत मोठा बदल करण्यात आला आहे.
आजपासून NPS खाते उघडल्यावर पॉइंट ऑफ प्रेझेन्स (POP) वर कमिशन दिले जाईल.
अशावेळी 1 सप्टेंबर 2022 पासून हे कमिशन 10 ते 15,000 रुपयांपर्यंत असेल.

 

Web Title :- Rule Change | rule change from today 1st september 2022 from toll tax to lpg cylinder rate

 

Join our WhatsApp Group, Telegram, facebook page and Twitter for every update

 

हे देखील वाचा