Pune Ganeshotsav 2023 | कोरोना नंतरही ‘फिरते गणेश विसर्जन हौद’ सुरू राहणार!

यंदा निविदा न काढण्याचा निर्णय प्रशासनाने ‘कोणासाठी’ फिरविला?

पुणे : पोलीसनामा ऑनलाईन – Pune Ganeshotsav 2023 | कोरोनाची साथ सुरू असताना गणेशोत्सवात संसर्ग टाळण्यासाठी महापालिकेच्या Pune Municipal Corporation (PMC) वतीने घरगुती गणेश मूर्तींचे विसर्जन करण्याकरिता सुरू केलेले फिरते विसर्जन हौद यंदाही घेण्याचा निर्णय घेतला आहे. विशेष असे की, घनकचरा विभागाच्या यापूर्वीच्या प्रमुख आशा राऊत (Asha Raut PMC) यांनी काही आठवड्यांपूर्वीच यंदा फिरते विसर्जन हौद घेणार नाही, असे स्पष्ट केले असतानाच त्यांच्या बदलीनंतर आठवड्याभरातच फिरत्या हौदांसाठी निविदा काढण्यात आली आहे. (Pune Ganeshotsav 2023)

घनकचरा विभागाने आज काढलेल्या निविदेमध्ये झोन एक, तीन आणि चार साठी व झोन दोन व पाच साठी अशा दोन पॅकेज मध्ये निविदा मागविल्या आहेत. प्रत्येक झोनमध्ये 30 फिरते हौद असे 150 फिरते हौद असतील. यासाठी दीड कोटी रुपये खर्च येणार आहे. (Pune Ganeshotsav 2023)

कोरोनाची साथ असताना 2020 मध्ये महापालिका प्रशासनाने संसर्ग टाळण्यासाठी फिरत्या हौदांची संकल्पना राबवली होती.
ट्रक वर ठेवलेल्या हौदामध्ये गणेश मूर्ती विसर्जन अशी संकल्पना होती. गणेशोत्सवाच्या अगदी दुसऱ्या दिवसापासून सोसायट्या आणि वसाहतींच्या परिसरात हे ट्रक फिरवून विसर्जन सोहळा पार पाडला गेला. 2021 मध्येही साथ सुरूच असल्याने पुन्हा फिरते हौद कंत्राटी पद्धतीने घेण्यात आले. कोरोना परिस्थितीमुळे पुणेकरांनी याचे स्वागत केले. मात्र गेल्यावर्षी मुख्यमंत्र्यांनी उत्सव निर्बंध मुक्त केल्याने पालिकेने ठिकठिकाणी उभारलेल्या विसर्जन हौदावर विसर्जन केले. त्याचवेळी फिरत्या हौदांकडे पाठ फिरवली.

या पार्श्वभूमीवर विसर्जनाचे व्यवस्थापन पाहणाऱ्या घनकचरा विभागाच्या प्रमुख आशा राऊत यांनी यंदा फिरते विसरर्जन
हौद बंद करण्यात येणार असून पूर्वीच्या हौदांची दुरुस्ती व रंगरंगोटी करून ते वापरात आणले जातील असे स्पष्ट केले होते.
मात्र मागील आठवड्यात त्यांची बदली झाली. त्यांच्या बदलीनंतर नवीन आलेले उपायुक्त संदीप कदम यांनी आज
150 फिरते विसर्जन हौद पुरवण्याची निविदा काढली आहे. विशेष असे की सार्वजनिक गणेशोस्तव मंडळांच्या बैठकीत
ज्याकडे बहुतांश मंडळांनी पाठ फिरवली होती त्या बैठकीत आलेल्या सूचनेनुसार घरगुती गणेश विसर्जनासाठी ही
निविदा काढण्यात आल्याची माहिती प्रशासनातील अधिकाऱ्यांनी दिली

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

हे देखील वाचा

Vagus Nerve Stimulation | व्हेगस नस दाबताच मायग्रेन आणि स्ट्रेससारखे आजार होतील नष्ट, जाणून घ्या याचे आणखी फायदे

Curry Leaves | शरीरासाठी वरदान ही छोटी-छोटी पाने, ब्लड शुगर करतील नष्ट, किंमत अवघी 5 रुपये, वेदनांपासून मिळेल आराम

Health Tips | रिकाम्या पोटी चुकूनही करू नका ‘या’ 5 गोष्टींचे सेवन, पोटात तयार होईल अ‍ॅसिड, लिव्हरचे होईल नुकसान

Skin Care Tips | चेहर्‍यावरील मुरुमांनी त्रस्त आहात का? मग ‘या’ 4 प्रकारे करा लाल चंदनाचा वापर