Curry Leaves | शरीरासाठी वरदान ही छोटी-छोटी पाने, ब्लड शुगर करतील नष्ट, किंमत अवघी 5 रुपये, वेदनांपासून मिळेल आराम

नवी दिल्ली : Curry Leaves | आरोग्यासाठी कढीपत्ता चमत्कारिक आहे. या पानांमध्ये औषधी गुणधर्म असतात, जी डायबिटीज कंट्रोल ठेवतात. कढीपत्ता खाल्ल्याने हार्ट डिसीज आणि ब्रेनसंबंधित आजारांचा धोकाही कमी होतो. रोज ५-६ कढीपत्ता खाल्ल्याने आरोग्य चांगले राहते. कढीपत्ता खाण्याचे ५ आश्चर्यकारक फायदे जाणून घेऊया (Health Benefits of Curry Leaves).

हेल्थलाइनच्या रिपोर्टनुसार, कढीपत्त्याचे सेवन केल्याने हाय कोलेस्ट्रॉल आणि ट्रायग्लिसराइडची पातळी नियंत्रित राहते. यामुळे हृदयविकाराचा धोका कमी होतो. (Curry Leaves)

शुगरच्या रुग्णांसाठी कढीपत्ता खूप चमत्कारिक आहे. याच्या सेवनाने ब्लड शुगर कंट्रोल राहते. प्राण्यांवरील संशोधनात आढळून आले की कढीपत्ता अर्क ब्लड शुगर लेव्हल कमी करतो. तो मज्जातंतूचे दुखणे आणि किडनी डॅमेजमध्ये तसेच डायबिटीजच्या अनेक गुंतागुंतांपासून संरक्षण करतो. कढीपत्ता इन्सुलिन सेन्सिटीव्हिटी सुधारतो.

कढीपत्त्याला नॅचरल पेन रिलिव्हर मानले जाते. यातील पोषक तत्व नैसर्गिक पद्धतीने वेदनांपासून आराम देतात. कढीपत्ता केसांसाठी खूप लाभदायक आहे. याच्या सेवनाने केस गळती थांबते. यातील बीटा-कॅरोटीन आणि प्रोटीन केसांची मुळे मजबूत करतात.

कढीपत्ता मेंदूसाठी चांगला मानला जातो.
अनेक संशोधनांमधून समोर आले आहे की कढीपत्ता मेंदू आणि मज्जासंस्थेचे संरक्षण करतो. त्यामुळे मेंदू निरोगी राहतो. कढीपत्ता अल्झायमरसारख्या न्यूरोडीजनरेटिव्ह स्थितीमधून वाचवतो. याबाबत मानवावरील संशोधनाची गरज आहे.

कढीपत्ता लठ्ठपणा आणि वजन कमी करण्यासाठी उपयुक्त आहे.
कढीपत्ता डिटॉक्सिफायिंग एजंट म्हणून काम करतो. तो शरीरातील विषारी घटक काढून टाकतो.
तसेच शरीरात चरबी जमा होण्यास प्रतिबंध करतो.
यामुळे वजन कमी होते. दररोज १०-१५ कढीपत्त्याचे सेवन केल्यास वजन कमी होते.

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

हे देखील वाचा

Hair Loss | पुरुषांचे अकाली पडतेय टक्कल, हेयरफॉलची ‘ही’ 5 कारणं, जाणून घ्या डॉक्टरांचा सल्ला,
केसगळतीला लागेल ब्रेक

Dirty Bedsheet | तुम्ही सुद्धा खुप दिवसांपासून बेडशीट धुतलेले नाही का? निष्काळजीपणा पडू शकतो महागात,
होऊ शकतात 5 मोठे आजार

Acne Pigmentation | मुरूम-फुटकुळ्या ताबडतोब होतील क्लीन बोल्ड, 5 सिम्पल फॉर्म्युले करा फॉलो,
गॅरंटीने होतील दूर