पुण्यातील धक्कादायक घटना ! अनिवासी भारतीय तरूणीवर सामूहिक बलात्कार, सर्वत्र खळबळ

पुणे : पोलीसनामा ऑनलाइन – अ-निवासी भारतीय तरूणीवर पुण्यातील लोहगाव विमानतळ परिसरात सामूहिक बलात्कार झाल्याची धक्कादायक घटना मंगळवारी उघडकीस आली आहे. लिफ्ट देणार्‍या दुचाकीस्वाराने एका मित्राच्या मदतीने तिला निर्जनस्थळी नेऊन बलात्कार केला आहे. यामुळे राज्यात खळबळ उडाली आहे. हॉटेलात जेवण करून रिक्षाची वाट पाहत थांबल्यानंतर हा प्रकार घडला आहे.

याप्रकरणी 28 वर्षीय महिलेने विमानतळ पोलीस ठाण्यात तक्रार दिली आहे. त्यानुसार दोघांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, पिडीत तरूणी ऑगस्ट महिन्यात टुरिस्ट व्हिझावर भारतात आली आहे. ती पुण्यातील तिच्या बहणीसोबत राहते. तिचा साड्या इम्पोर्टचा व्यावसाय आहे. दरम्यान सोमवारी रात्री उशिरा मुंढवा परिसरात जेवण करण्यासाठी एकटीच आली होती. साडे बारा वाजता जेवणकरून हॉटेलच्या बाहेर मुंढव्याकडे जाणार्‍या रस्त्यावर उभी होती. यावेळी एकजण मोपेड दुचाकीवर तिच्याजवळ आला. तिला इंग्रजीत संवाद साधत लिफ्टच्या बहाण्याने दुचाकीवर बसविले. त्यानंतर त्याने फोनकरून त्याच्या एका मित्राला बोलाविले. त्याच दुचाकीवरून तरूणीला लोहगाव विमानतळ परिसरात एका निर्जनस्थळी नेले. त्याठिकाणी सामूहिक बलात्कार केला. त्यानंतर ते दोघेही तिला सोडून निघाले.

मात्र, तरूणीने विनंती करून त्यांना मेनरोडवर सोडण्यास सांगितले. त्यामुळे तरूणीला घेऊन येत असताना तरूणीने रस्त्यांवर नागरिक पाहून आरडा-ओरडा केला. त्यावेळी त्यांची दुचाकी स्लीप झाली आणि तिघेही खाली कोसळले. लोक जमा होत असल्याचे पाहून दुचाकीस्वार तेथून पसार झाले. तरूणीने नागरिक येताच प्रथम तिच्या बहिणीला फोन केला. त्यानंतर तरूणीने विमानतळ पोलीसांकडे धाव घेऊन तक्रार दिली.

दरम्यान, अनिवासी भारतीय तरुणीवर सामूहिक बलात्कार झाल्याचे शहरासह राज्यात चांगलीच खळबळ उडाली आहे. पोलीसांकडून त्या दुचाकीस्वार दोघांचा शोध घेतला जात आहे. पोलीसांनी गुन्हा दाखल करत परिसरातील सीसीटीव्ही फुटेजची तपासणी सुरू केली आहे.

फेसबुक पेज लाईक कराhttps://www.facebook.com/policenama/