Pune Gold Rate Today | सोन्याच्या दरात किंचित घसरण; आजचा पुण्यातील भाव काय? जाणून घ्या

पोलीसनामा ऑनलाइन टीम – Pune Gold Rate Today | मागील काही दिवसांपासून सोने आणि चांदीच्या किमतीत (Gold-Silver Price Today) सतत बदल होताना पहायला मिळत आहे. आजही (दि. 10 जून) रोजी सोन्याच्या दरात किंचित घट झाली आहे. तर चांदीच्या दरात वाढ दिसून येते. आज 10 ग्रॅम 22 कॅरेट सोन्याचा दर (Pune Gold Rate Today) 54,826 रुपये आहे. तर 24 कॅरेट सोन्याचा दर 59.810 रुपये आहे. पुण्यामध्ये आज प्रति 10 ग्रॅम 22 कॅरेट सोन्याचा भाव 54,826 रुपये आहे, तर 24 कॅरेट सोन्याचा भाव 59.810 रुपये आहे.

 

शुक्रवारी 10 ग्रॅम सोन्याचा भाव 59,900 (24 कॅरेट) रूपये होता. आज त्यामध्ये घट दिसून येत आहे. उत्पादन शुल्क, राज्य कर आणि मेकिंग चार्जेसमुळे संपूर्ण भारतात सोन्याच्या दागिन्यांच्या किमतीत (Pune Gold Rate Today) बदल होत असतात. सराफा बाजाराच्या (Bullion Market) वेबसाईट नुसार आज चांदी 73,960 रुपये प्रति किलो दराने विकली जात आहे. मागील ट्रेडमध्ये चांदीची किंमत 73,860 रुपये प्रतिकिलो होती.

 

आजचे सोन्याचे दर –

पुणे (Pune) –

22 कॅरेट सोन्याचा दर (प्रति 10 ग्रॅम) – 54,826 रुपये
24 कॅरेट सोन्याचा दर (प्रति 10 ग्रॅम) – 59.810 रुपये

 

मुंबई (Mumbai) –

22 कॅरेट सोन्याचा दर (प्रति 10 ग्रॅम) – 54,826 रुपये
24 कॅरेट सोन्याचा दर (प्रति 10 ग्रॅम) – 59.810 रूपये

 

नागपूर (Nagpur) –

22 कॅरेट सोन्याचा दर (प्रति 10 ग्रॅम) – 54,826 रूपये
24 कॅरेट सोन्याचा दर (प्रति 10 ग्रॅम) – 59.810 रुपये

 

नाशिक (Nashik) –

22 कॅरेट सोन्याचा दर (प्रति 10 ग्रॅम) – 54,826 रूपये
24 कॅरेट सोन्याचा दर (प्रति 10 ग्रॅम) – 59.810 रुपये

 

सोन्याची शुद्धता कशी तपासावी?

सोन्याची शुद्धता तपासण्यासाठी अ‍ॅप तयार करण्यात आले. ‘बीआयएस केअर अ‍ॅप’ (‘BIS Care App) या अ‍ॅपद्वारे ग्राहक (Customer) सोन्याची शुद्धता तपासू शकतात. तसेच या अ‍ॅपच्या मदतीने तुम्ही केवळ सोन्याची शुद्धता तपासू शकत नाही, तर त्याबाबतच्या तक्रारीही नोंदवू शकता. वस्तूंचा परवाना, नोंदणी आणि हॉलमार्क क्रमांक (Registration And Hallmark Number) चुकीचा आढळल्यास, ग्राहक या अ‍ॅपवरून तत्काळ तक्रार करू शकतात. या अ‍ॅपच्या माध्यमातून ग्राहकाला तत्काळ तक्रार दाखल करण्याची माहितीही मिळणार आहे.

 

Web Title : Pune Gold Rate Today | Slight decline in gold prices; What is today’s price in Pune? Gold-Silver Price on 10 June 2023

 

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

 

हे देखील वाचा