Pune Hadapsar Crime | दहाव्या मजल्यावरुन पडून मजुराचा मृत्यू, हडपसर परिसरातील घटना; कॉन्ट्रॅक्टरवर गुन्हा दाखल

पुणे : पोलीसनामा ऑनलाइन – Pune Hadapsar Crime | नियोजित इमारतीचे बांधकाम करत असताना दहाव्या मजल्यावरुन पडून मजुराचा मृत्यू झाला. हा प्रकार हडपसर परिसरातील फुरसुंगी (Fursungi) येथील ग्रीन पार्क, फेज-1 या बांधकाम साईटवर घडला आहे. याप्रकरणी बांधकाम साईटवरील कॉन्ट्रॅक्टर सह दोघांवर हडपसर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल केला आहे. हा प्रकार मंगळवारी (दि.20) सकाळी पावणे नऊ वाजण्याच्या सुमारास घडला आहे. (Pune Hadapsar Crime)

ज्ञानबाबू छन्गालाल प्रजापती (वय-44) असे मृत्यू झालेल्या मजुराचे नाव आहे. याप्रकरणी पुत्तुनलाल रामकुमार प्रजापती (वय-32 रा. फुरसुंगी गाव, हडपसर) यांनी हडपसर पोलीस ठाण्यात (Hadapsar Police Station) फिर्य़ाद दिली आहे. यावरून कॉन्ट्रॅक्टर सोमनाथ हरेश्वर जगदाळे (वय 41 रा. वृंदावन कॉलनी, फुरसुंगी), संतोषकुमार शिवकुमार प्रजापती (वय-38) यांच्यावर आयपीसी 304(अ), 288, 34 नुसार गुन्हा दाखल केला आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फुरुसंगी येथे ग्रीन पार्क फेज-1 ची बांधकाम साईट सुरु आहे.
फिर्यादी यांचा चुलत भाऊ मयत बांधकाम साईटवर काम करत होता.
ज्ञानबाबू प्रजापती हे मंगळवारी सकाळी पावणे नऊ वाजण्याच्या सुमारास दहाव्या मजल्यावरील डक्ट मध्ये काम करत होते.
तेव्हा तोल जाऊन ते तळमजल्यावर पडले. यामध्ये गंभीर जखमी होऊन ज्ञानबाबू यांचा मृत्यू झाला. बांधकाम मजुरांच्या सुरक्षिततेसाठी कोणतीही साधनसामग्री न पुरविल्याने ही दुर्घटना घडल्याचे पोलीस तपासात निष्पन्न झाले. याप्रकरणी दोघांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास पोलीस करीत आहेत.

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

हे देखील वाचा

BJP MP Raksha Khadse | नाथाभाऊंच्या भाजपा घरवापसीबाबत रक्षा खडसेंचे सूचक वक्तव्य, ”बरेच लोकांचीही इच्छा…”

पिंपरी : जुन्या भांडणाच्या कारणावरुन तरुणावर कोयत्याने वार, वाकड परिसरातील घटना; तिघांना अटक

Lok Sabha Election 2024 | पिंपरी : जास्त बुथ संख्या असलेल्या मतदान केंद्रांची पोलीस आयुक्तांकडून पाहणी

Chhagan Bhujbal Vs Manoj Jarange Patil | ”…तर मनोज जरांगेंवर मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करावा”; छगन भुजबळांची मागणी, प्रकरण काय?