Pune : हडपसर परिसरातील ज्वेलर्सच्या दुकानाचं शटर उचकटलं

पुणे : पोलिसनामा ऑनलाइन – शहरात आता बंद फ्लॅट सोबत बंद दुकान फोडण्याच्या घटना वाढीस लागल्या असून, हडपसर येथील ज्वेलर्स दुकानाचे शटर उचटकटून चोरट्यांनी ५० हजारांचे दागिने चोरुन नेल्याची घटना उघडकीस आली आहे. दोन दिवसांपुर्वी हा प्रकार घडला आहे.

याप्रकरणी सवाईसिंग राठोड (वय २७, रा. भेकराईनगर ) यांनी हडपसर पोलिस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यानुसार अज्ञाताविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, सवाईसिंग यांचे महादेव ज्वेलर्स नावाचे दुकान आहे. १८ ते १९ ऑक्टोबर कालावधीत चोरट्यांनी त्यांच्या दुकानाचे शटर उचकटून ५० हजारांचे दागिने चोरुन नेले. अधिक तपास पोलीस हवालदार पाटील हे करीत आहेत.

तसेच शेवळवाडी भागात चोरट्यांनी बंद घराचे कुलूप उचकटून कपाटातील १५ हजारांच्या रोकडसह १ लाख ६५ हजारांचा ऐवज चोरुन नेला. याप्रकरणी आकाश कोलते (वय २२, रा. शेवाळेवाडी ) यांनी हडपसर पोलिस ठाण्यात फिर्याद दिली आहे. अधिक तपास सुरू आहे.

You might also like