Pune Hawker Committee Meeting | पुणे शहरातील फेरीवाल्याचे पुन्हा सर्वेक्षण होणार! फुड झोनची निर्मिती करण्याचा फेरीवाल समितीच्या बैठकीत निर्णय

पुणे : पोलीसनामा ऑनलाइन – Pune Hawker Committee Meeting | पुणे शहरातील फेरीवाली समितीच्या बैठकीमध्ये शहरातील पथारीवाल्यांचे पुन्हा सर्वेक्षण (Survey) करणे आणि शहरामध्ये फूड झोन (Food Zone) तयार करण्याचा निर्णय घेण्यात आला. याशिवाय पथविक्रेता उपजिविका योजना तयार करण्यासाठी समिती नियुक्त करण्याचा निर्णय बैठकीमध्ये घेण्यात आला. पुणे शहर फेरीवाला समितीची बैठक (Pune Hawker Committee Meeting) अध्यक्ष आणि महापालिका आयुक्त विक्रम कुमार (IAS Vikram Kumar) यांच्या उपस्थितीत पार पडली. यावेळी समितीचे सदस्य उपस्थित होते.

शहरातील नोंदणीकृत पथारी व्यावसायिकांनी मतदान करून निवडुन दिलेल्या सदस्यांचा यात समितीमध्ये समावेश आहे. समितीत प्रशासन नियुक्त सदस्यांची नियुक्ती गेल्या महिन्यात झाली. निवडणुक झाल्यापासून समितीची बैठक झाली नव्हती. नऊ महीन्यानंतर मंगळवारी (दि.5) ही पहीली बैठक पार पडली. बैठकीमध्ये प्रामुख्याने फेरीवाल्यांच्या मागण्यांबाबत चर्चा झाली.

केंद्र सरकारने (Central Government) केलेल्या कायद्यानुसार 2017 मध्ये पथविक्रेता उपजिविका योजना तयार केली होती. त्याविरोधात मुंबई हाय कोर्टात (Bombay High Court) याचिका दाखल करण्यात आली होती. कायद्यानुसार ही योजना फेरीवला समिती अस्तित्वात असल्यानंतर तयार करणे आवश्यक असल्याचा दावा याचिकेत करण्यात केला होता. तो न्यायालयाने मान्य केला होता.

पुणे महापालिकेत (Pune Municipal Corporation (PMC) फेरीवाला समितीची (Pune Hawker Committee Meeting) निवडणूक होऊन काही स्वयंसेवी संस्थांच्या प्रतिनिधींची या समितीवर नियुक्ती झाली आहे. त्यामुळे पथविक्रेता उपजिविका योजना तयार करण्यासाठी समिती नियुक्त करण्याचा निर्णय घेतला असल्याची माहिती अतिक्रमण विभागाचे उपायुक्त (Encroachment Deputy Commissioner) माधव जगताप (Madhav Jagtap) यांनी दिली.

या योजनेत विक्री प्रमाणपत्र, परवाना देणे इत्यादी मार्गदर्शक तत्वांचा समावेश असणार आहे. तसेच परवाना देताना तृतीय पंथीय, एकल माता, विधवा, दिव्यांग इत्यादींना किती टक्के देण्यात यावे याबाबत स्पष्टता नाही. अशा अनेक गोष्टींचा समावेश असलेली ही योजना राज्य सरकारला सादर करण्यात येणार आहे. त्यानंतर सरकार इतर महापालिका क्षेत्राकडून आलेल्या योजनांचा एकत्रित विचार करून सर्वंकष योजना जाहीर करेल, असेही माधव जगताप म्हणाले.

पथारींचे पुन्हा सर्वेक्षण होणार

पुणे महापालिकेच्या क्षेत्रात पथारी व्यावसायिक यांची नोंदणी करण्यासाठी बायोमेट्रिक पद्धतीचा (Biometric Registration) वापर केला गेला. यामध्ये तब्बल 13 हजार पथारी व्यवसायिकांनी नोंद केली आहे. नोंदणी करण्यासाठी पुन्हा एकदा सर्वेक्षण करण्यात येणार आहे. त्याआधी पालिकेने बांधलेले गाळे, सार्वजनिक वापराच्या जागा इत्यादिंचे सर्वेक्षण करण्यात येणार आहे. त्यामुळे पथारी व्यवसायिकांचे पुनर्वसन करता येणार आहे.

फुड झोनच्या ठिकाणी सिलेंडरवर कारवाई नाही

खाद्य पदार्थांची विक्री करणाऱ्या विक्रेत्यांकडून सिलेंडरचा वापर केला जातो.
सिलेंडरचा वापर करणाऱ्या व्यवसायिकांवर अतिक्रमण विभागाकडून कारवाई केली जाते.
ही कारवाई करु नये अशी मागणी समितीच्या काही सदस्यांनी केली होती.
यावर स्पष्टीकरण देताना प्रशासनाने सांगितले की, ज्या ठिकाणी फुड झोन आहे अशा ठिकाणी
कारवाई केली जाणार नाही. वास्तविक कायद्यानुसार तयार खाद्यपदार्थ पथारी व्यावसायिकांनी विकले पाहिजे.
खाद्यपदार्थ जागेवर करण्यास मनाई असून फुड झोन वगळता इतर ठिकाणी कारवाई केली जाईल,
असे प्रशासनाने स्पष्ट केले.

शहरातील फुड झोनची संख्या वाढवणार

पुणे शहरामध्ये फुड झोनची संख्या खूपच कमी आहे. शहरात अनेक ठिकाणी खाद्यपदार्थांचे
अनेक स्टॉल एकाच ठिकाणी असून अशी ठिकाणे फूड झोन म्हणून जाहीर केली जाणार आहेत.
त्यामुळे हे फुड झोन जाहीर केल्यानंतर याठिकाणी सिलेंडरवर होणारी कारवाई कमी होण्यास मदत मिळणार आहे.

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

हे देखील वाचा

Bachchu Kadu | बच्चू कडू यांनी बोलून दाखवली पंकजा मुंडेंसोबत युतीची इच्छा; राज्यात नवे राजकीय समीकरण?

Maratha Reservation | थोडी सबुरी ठेवावी लागले, सरकारचं शिष्टमंडळ जालन्यातील अंतरवाली सराटी गावात दाखल

Pune Traffic Updates | डेक्कन व चतु:श्रृंगी वाहतूक विभागांतर्गत वाहतुकीत बदल

Dr. Vaishali Waghmare Suspended | 17 कोटींच्या गैरव्यवहारप्रकरणी खेडच्या तत्कालीन तहसीलदार
डॉ. वैशाली वाघमारे निलंबित

MLA Ravindra Dhangekar | आनंदाच्या क्षणांना सामाजिक उपक्रमांची जोड स्तुत्य;
आमदार रवींद्र धंगेकर यांचे मत