Pune Traffic Updates | डेक्कन व चतु:श्रृंगी वाहतूक विभागांतर्गत वाहतुकीत बदल

पुणे : पोलीसनामा ऑनलाइन – Pune Traffic Updates | वाहतूक सुरक्षित व सुरळीतपणे सुरू राहण्याकरीता पुणे शहरातील डेक्कन वाहतूक विभागांतर्गत (Deccan Traffic Division) १२२८/बी, ग्रीन ऍट, आपटे रोड, पुणे या अपार्टमेंट समोरील उत्तरेस असलेल्या रस्त्यावर डी.पी. बॉक्स ते व्हिनस लेन पर्यंत रस्त्याच्या दोन्ही बाजूस तसेच अपार्टमेंटसमोरील पश्चिमेस जाणाऱ्या रस्त्यावर डी.पी. पर्यंत रस्त्याच्या दोन्ही बाजूस नो पार्कींग करण्यात आले आहे. (Pune Traffic Updates)

वाहतूक बदलाबाबत या तात्पुरत्या आदेशाच्या अनुषंगाने नागरिकांच्या काही सूचना व हरकती असल्यास त्या पोलीस उप आयुक्त, वाहतूक नियंत्रण शाखा, येरवडा पोस्ट ऑफिस, बंगला क्रमांक 6, जेल रोड, पुणे यांच्या कार्यालयात १३ सप्टेंबर पर्यंत लेखी स्वरूपात कळविण्यात याव्यात. नागरिकांच्या सूचना व हरकतीवर विचार करून व अत्यावश्यक सेवेतील वाहने खेरीज करून वाहतूक बदलाबाबत अंतिम आदेश निर्गमित करण्यात येतील, असे उप आयुक्त वाहतूक, पुणे शहर विजयकुमार मगर यांनी कळविले आहे. (Pune Traffic Updates)

चतु:श्रृंगी वाहतूक विभागांतर्गत प्रायोगिक तत्वावर वाहतुकीत बदल

चतु:श्रृंगी वाहतूक विभागांतर्गत (Chaturshringi Traffic Division) सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ चौक (Pune University Chowk) येथे मेट्रो व एकात्मिक दुमजली उड्डाणपुलाचे काम व एबील हाऊस (रेंजहिल्स कॉर्नर) या ठिकाणी रस्त्याचे मध्यभागी पिलरचे काम सुरू करण्यात येणार असल्याने रेंजहिल्स कॉर्नर येथील रस्त्याचा भाग (पंक्चर) तात्पुरत्या स्वरूपात बंद करणे गरजेचे आहे. वाहनचालकांची गैरसोय होवू नये याकरिता चतु:श्रृंगी वाहतूक विभागांतर्गत रेंजहिल्स कॉर्नर परिसरातील वाहतूकीत २९ ऑगस्ट पासून पुढील आदेशापर्यंत प्रायोगिक तत्वावर बदल करण्यात आला आहे.

त्यानुसार वाहनचालकांना शिवाजीनगरकडून येऊन एबील हाऊस (रेंजहिल्स कॉर्नर)
येथून उजवीकडे वळून रेंजहिल्सकडे जाण्यास मनाई करण्यात आली असून शिवाजीनगरकडून
येऊन रेंजहिल्सकडे जाण्याकरिता कॉसमॉस बँक समोर मेट्रोचे पीलर नं. २० व २१ च्या मधून यु-टर्न घेवून रेंजहिल्स कॉर्नर येथून डावीकडे वळून इच्छितस्थळी जाण्यासाठी पर्यायी मार्ग असणार आहे.

नागरिकांनी प्रायोगिक तत्वावर केलेल्या वाहतूक बदलाची नोंद घेऊन सहकार्य करावे, असेही मगर यांनी कळविले आहे.

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

हे देखील वाचा

Bachchu Kadu | बच्चू कडू यांनी बोलून दाखवली पंकजा मुंडेंसोबत युतीची इच्छा; राज्यात नवे राजकीय समीकरण?

Maratha Reservation | थोडी सबुरी ठेवावी लागले, सरकारचं शिष्टमंडळ जालन्यातील अंतरवाली सराटी गावात दाखल

Dr. Vaishali Waghmare Suspended | 17 कोटींच्या गैरव्यवहारप्रकरणी खेडच्या तत्कालीन तहसीलदार
डॉ. वैशाली वाघमारे निलंबित