Pune : शहरात घरफोड्या करणाऱ्या चोरट्यांचा धुमाकूळ सुरूच

पुणे : पोलिसनामा ऑनलाइन – शहरात घरफोड्या करणाऱ्या चोरट्यांचा धुमाकूळ सुरूच असून, धनकवडी व दत्तवाडीत दोन फ्लॅट फोडून सव्वा तीन लाखांचा ऐवज चोरून नेला आहे.

याप्रकरणी आंबिल ओढा परिसरात राहणारे खंडू दशरथ पवार (वय ५०) यांनी दत्तवाडी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. पवार हे चार सप्टेंबरला रात्री कामाच्या निमित्ताने बाहेर गेले होते. त्यानंतर अज्ञात चोरट्यांनी त्यांच्या फ्लॅटच्या गॅलरीतून आत प्रवेश केला. त्यांच्या घरातून ६३ ग्रॅम सोने, ५५ ग्रॅम चांदी व रोख ८१ हजार रुपये असा तीन लाख १२ हजार रूपयांचा ऐवज चोरून नेला. घरी परत आल्यानंतर हा प्रकार समोर आला आहे.

तर दुसरी घटना धनकवडी परिसरात घडली आहे. याप्रकरणी सहकारनगर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. निला अशोक जोशी (वय ७२) यांच्या फ्लॅटमध्ये घुसून चोरट्यांनी 10 हजारांचा ऐवज नेला आहे. २९ ऑगस्ट रोजी कामाच्या निमित्ताने घर बंद करून बाहेरगावी गेले होते. त्यानंतर चोरट्यांनी घरफोडले आहे. घरातील १० ग्रॅमची चांदीची नाणी,ताब्याची भांडे व रोख रक्कम असा ऐवज नेला आहे.