पुणे : आरक्षणावर सरकार किती दिवस माैन पाळणार : उदयनराजे भोसले

पुणे : पाेलीसनामा ऑनलाईन

राष्ट्रवादीचे खासदार उदयनराजे भोसले यांनी आज पुण्यात पत्रकार परिषद घेतली. यावेळी बाेलताना उदयनराजे भोसले यांनी आरक्षणाबाबत निर्णय हाेईल आत्महत्या नकाे, असे आवाहन केले.  साेयीच्या राजकारणामुळे आजपर्यंन्त अनेक बळी गेले. वेळीच आरक्षण दिलं असतं तर, आयाेगाची गरज पडली नसती. जाे स्वत:चा जीव देऊ शकताे, ताे घेऊही शकताे. अशा राेख शब्दात उदयनराजे यांनी सरकारला बजावले.  आरक्षणाबाबतीत सरकार वेळकाढूपणा करतयं. आंदाेलकांचा उद्रेक झाला तर, काय हाेऊल?. याविषयी बाेलताना ते म्हणाले, आरक्षणावर ताेडगा काढा अन्यथा उद्रेक हाेईल. आरक्षणावर सरकार किती दिवस माैन पाळणार आहे. स्वत:च्या अधिकारांसाठी सस्त्यावर उतरावं लागतं. अशा राेख ठाेक शब्दात उदयनराजे पत्रकार परिषदेत मराठा आरक्षणावरून बाेलत हाेते.
[amazon_link asins=’B075FY4RWK’ template=’ProductCarousel’ store=’policenama-100′ marketplace=’IN’ link_id=’17efcb64-98af-11e8-8d55-91f7fe2af1c9′]

आंदोलनाचे समन्वयक, तज्ञ, इतिहास अभ्यासक उपस्थित होते. यावेळी आंदोलनाची पुढील दिशा काय असावी यावर मंथन झालं. आरक्षणाबाबत निर्णय होईपर्यंत तोडफोड किंवा आत्महत्या करू नये. तीस वर्ष झाली तरी आरक्षण मिळालं नाही अजून किती वाट पहायची ? असा सवाल देखील त्यांनी उपस्थित केला.