पुण्यात पतीकडून पत्नीला पट्टयाने मारहाण, कारण जाणून व्हाल थक्क

पुणे : पोलीसनामा ऑनलाइन  –  कोरोना झाल्यानंतर आईकडे जाण्यास विरोध केल्याने पतीने पत्नीला शिवीगाळ करुन पट्टयानेआणि हाताने मारहाण केल्याची घटना घडली आहे. शहरातील बी.टी. कवडे भागात घडली आहे.

याप्रकरणी ३८ वर्षीय महिलेने मुंढवा पोलिस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यानुसार पतीवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी महिलेच्या पतीला आणि मुलाला कोरोनाचा संसर्ग झाला आहे. तरीही तिचा पती त्याच्या खोपोलीत असणाऱ्या आईकडे जाण्याचा प्रयत्न करीत होता. कोरोनाचा संसर्ग होऊ नये म्हणून, तुम्ही आईकडे जाऊ नका असे, सांगत पत्नीने पतीला जाण्यास विरोध केला. त्यामुळे २७ जूनला मध्यरात्री साडेबाराच्या सुमारास त्यांच्यात भांडणे झाली. मात्र तरीसुद्धा पती खोपोलीला जाण्यास ठाम होता. पत्नी आपल्याला आईकडे जाऊ देत नाही या रागातून त्याने पत्नीला शिवीगाळ करीत हाताने, पट्टयाने , काठीने पोटावर, पाठीवर मारहाण करुन जखमी केले. मारहाणीत पत्नी जखमी झाली होती. प्रथम त्यांनी उपचार घेतले. त्यानंतर महिलेने मुंढवा पोलिस ठाण्यात फिर्याद दिली. त्यानुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे. अधिक तपास मुंढवा पोलीस करत आहेत.