Pune : पत्नी माहेरी निघून गेल्याच्या रागातून पतीकडून विवाहीतेवर चाकूने वार

पुणे : पोलीसनामा ऑनलाइन –  पत्नी माहेरी निघून गेल्याच्या रागातून पतीने पत्नीवर चाकूने वार केल्याचा प्रकार घडला आहे. लोणीकंद पोलिस ठाण्याच्या परिसरात ही घटना घडली आहे.

याप्रकरणी 30 वर्षीय महिलेने लोणीकंद पोलिसांत फिर्याद दिली आहे. त्यानुसार पती सुरेश शिंगाडे याच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी व त्यांचे पती यांच्यात कौटुंबिक कारणावरून वाद आहेत. यामुळे फिर्यादी या काही दिवसांपूर्वी पतीचे घर सोडून माहेरी निघून आल्या होत्या. दरम्यान बुधवारी (दि. 31 मार्च) भाऊ व बहिणी यांच्यासोबत वाडेबोल्हाई येथे बोलत थांबल्या होत्या. त्यावेळी आरोपी तेथे आला. त्याने पत्नीला माहेरी निघून का आली असे म्हणत वाद घातला. तसेच या रागातून त्यांना जीवे मारण्याच्या उद्देशाने चाकूने गळ्यावर वार केला. फिर्यादी बहीण आणि भावाला बांबूने मारहाणकरून जिवंत सोडणार नाही, अशी धमकी दिली. त्यानंतर तो पसार झाला. यात फिर्यादी या गंभीर जखमी झाल्या आहेत. अधिक तपास लोणीकंद पोलीस करत आहेत.

घटस्फोटासाठी छळ

मॅट्रीमोनी साइटवर ओळख झाल्यानंतरच त्यांचा विवाह झाला. पण नंतर काहीच दिवसात पती व सासरच्यांनी घटस्फोट घेण्यास तगादा लावत छळ केल्याचा प्रकार समोर आला आहे. याप्रकरणी 37 वर्षीय महिलेने विश्रांतवाडी पोलिस ठाण्यात तक्रार दिली आहे. त्यानुसार पतीसह सहाजणांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी यांची आरोपी पतीसोबत मॅट्रीमोनी साईडवर ओळख झाली होती. त्यानंतर जुलै २०२० ला विवाह झाला. त्यानंतर मात्र, पती फिर्यादीकडे घटस्फोटाची मागणी करत होता. तर तो पैसेही मागत. तर पत्नीला शिवीगाळ, मारहाण, जीवे मारण्याची धमकी देत होता. तर पतीचे कुटुंबातील इतर त्याच्या कृत्याला प्रोत्साहन देत. याप्रकरणी महिलेने तक्रार अर्ज दाखल केला होता. त्या अर्जाची चौकशी करण्यात आली. त्यानुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे.