भारतातील पहिली स्वयंचलित ‘कोरोना’ चाचणी सिस्टीम लाँच, दररोज 400 चाचण्या करण्यास ‘सक्षम’

पुणे, पोलीसनामा ऑनलाईन : महाराष्ट्रातील पुणे शहरातील एका कंपनीने भारताची पहिली स्वयंचलित कोरोना चाचणी प्रणाली लॉन्च केली आहे. मायलॅब डिस्कव्हरी सोल्यूशन्स प्रायव्हेट लिमिटेड आणि सीरम इन्स्टिट्यूट ऑफ इंडियाने सुरू केलेल्या उपकरणाबद्दल सिरम इन्स्टिट्यूटचे सीईओ अदार पूनावाला यांनी ट्विट केले आहे की, ‘हे एका दिवसात 400 पेक्षा जास्त चाचण्या करू शकतात. तसेच, ऑपरेट करण्यासाठी केवळ एका व्यक्तीची आवश्यकता असेल. याद्वारे आपण कोरोनासारख्या कठीण काळात मनुष्यबळ वाचवू शकतो. तसेच कोरोना चाचणीची गतीही देशात वाढवता येते. त्याचबरोबर मायलॅब डिस्कव्हरी सोल्यूशन्सच्या ट्विटमध्ये असे म्हटले आहे की, आता कोविड – 19 ची टेस्टिंग लॅब उघडणे अधिक सुलभ होईल.

आवश्यकतेपेक्षा कमी होतेय चाचणी
लॉन्चिंग वेळी पूनावाला यांनी असेही म्हटले आहे की, या वर्षाच्या अखेरीस कोरोना विषाणूची लस येऊ शकते. सध्या भारतात क्षमतेपेक्षा कमी चाचणी केली जात आहे. भारतामध्ये मोठ्या प्रमाणात चाचणी किट तयार करण्याची क्षमता आहे. ते म्हणाले की, आमच्याकडे मोठ्या प्रमाणात चाचणी किट तयार करण्याची क्षमता आहे, परंतु समस्या ही आहे की आम्ही ते कुठे विकू?

वेग वाढविणे आवश्यक
पूनावाला असेही म्हणाले की, यावेळी खासगी आणि सरकारी प्रयोगशाळे लोकांना जास्त चाचणी करण्यास प्रोत्साहित करत नाहीत. परंतु चाचणीचा वेग अधिक असायला हवा. विशेष म्हणजे जगभरातील तज्ञ कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी चाचणी व क्वारंटाईनला खूप महत्त्व देत आहेत. 24 मार्चपासून सुरू झालेल्या लॉकडाऊननंतर भारतात वेगळ्या प्रक्रियेचे अनुसरण केले गेले आहे, परंतु चाचणीचा वेग अद्याप कमी आहे.