Pune : तरुणीला लग्नाचे आमिष दाखवून फसवणूक करणाऱ्यास जम्मू-काश्मीरमधून अटक

पुणे : पोलीसनामा ऑनलाइन – तरुणीला लग्नाचे आमिष दाखवून तिच्याशी शारीरिक संबंध प्रस्तापित करून लग्नास नकार देणाऱ्या आरोपीला पोलिसांनी जम्मू-काश्मिरातील कटरा येथून अटक केली. न्यायालयाने त्याला पाच दिवसांची पोलीस कोठडी सुनावली आहे.

शहजाद वाणी (वय ३०) असे अटक करण्यात आलेल्या आरोपीचे नाव आहे. याप्रकरणी तरुणीने सहकारनगर पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, पीडित तरुणी व आरोपी तरुण हा पुण्यामध्ये एकत्र कामाला होते. या दरम्यान त्यांची ओळख झाली होती. ओळखीचे रूपांतर प्रेमात झाले. त्यानंतर आरोपीने तिच्याशी लग्नाचे आमिष दाखवून २०१५ ते २०१७ या कालावधीत शारीरिक संबंध ठेवले. पुणे, कटरा, जम्मू अशा वेगवेगळ्या ठिकाणी नेऊन तिच्यावर लग्नाच्या आमिषाने बलात्कार केला. तिचे नग्नावस्थेतील फोटो काढून सोशल मीडियावर अपलोड करण्याची धमकी देऊन वारंवार जबरदस्ती केली. त्यानंतर लग्न करण्यासही नकार दिला. पीडित तरुणीने २ जुलैला सहकारनगर पोलीस ठाण्यात तक्रार दिली होती. कोरोनाची परिस्थिती निवळल्यानंतर सहकारनगर पोलिस ठाण्याचे एक पथक जम्मू-काश्मीरमध्ये गेले होते. त्यांनी आरोपीला अटक करून पुण्यात आणले. यासाठी त्यांना जम्मू-काश्मीर पोलिसांनीही मोठी मदत केली.